उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक..
हत्या करणे सहज आणि सोपे झाले असून कुठल्याही प्रकारच्या शस्त्रास्त्रे,साहित्याने हत्या करता येतय.हत्या करण्याची मनात भिती नसली की रागाच्या भरात केव्हाही आणि कुणाचीही हत्या करता येतय हे महाराष्ट्र राज्यांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात येत असलेल्या शेगाव (बु.) येथील हत्या घटनाक्रमांने दाखवून दिले आहे…
या हत्येच्या थराराने तर अनेकांचे मन हेलावून गेले आणि अनेकांचे मन शुन्य झाले.
शेगाव (बु.) येथील विठ्ठल मंदिर वार्ड मध्ये राहणाऱ्या श्री.गुलाब पत्रुजी दातारकर वय ५८ वर्ष यांची हत्या त्यांच्या मुलाने सकाळी ११ वाजताच्या दरम्यान आज दिनांक १९/०७/२०२५ रोज शनिवार ला केली.
मुलगा अभय गुलाब दातारकर वय ३४ वर्ष यांनी वडिलांच्या शरीरावर कुऱ्हाडीने सपासप वार करुन निर्दयीपणे जागीच ठार केले.हत्याचे मुळ कारण अजूनही पुढे आले नाही.
परंतु बापाच्या हत्या प्रकरणाने शेगाव (बु.) व परिसरातील नागरिक हादरले असून विश्वास ठेवायचा कुणावर हा प्रश्न त्यांना पडला आहे.
हत्या घटनाक्रमाची माहिती शेगाव (बु.) पोलिस स्टेशन येथे देण्यात आली असता ठाणेदार योगेंद्रसिंह यादव,पिएसआय सुमित कांबळे,एएसआय दिनकर घोटेकर,,मदन येरणे,निखील कौरासे,छगन जांभुळे,दिनेश ताटेवार,पोलिस शिपाई संतोष निषाद,प्रशांत गिरडकर,प्रगती भगत,हे घटना स्थळावर पोहचले आणि हत्येच्या आरोपीला अटक केली.
हत्या घटनाक्रमाचा पुढील तपास चंद्रपूर पोलीस अधीक्षक,चिमूर एसडिपिओ,यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार योगेंद्रसिंह यादव करीत आहेत.



