Home देशविदेश रोग : शरीराचे,मनाचे,बुद्धीचे…

रोग : शरीराचे,मनाचे,बुद्धीचे…

   माणसाचे शरीर मन बुद्धी हे तीन महत्त्वाचे घटक आहेत.हे तीन घटक जर रोगयुक्त असतील तर माणसाचे स्वास्थ्य( आरोग्य ) ठीक राहते,आणि या तीन घटकाला काही रोग जडले तर माणसाचे शारीरिक मानसिक बौद्धिक आरोग्य ठीक राहत नाही.आरोग्य ठीक तर सर्वकाही ठीक.नाहीतर सर्वचकाही म्हणजे जीवनच बिघडेल.

          या तिन्हीपैकी सर्वात महत्वाचे हे शरीर आहे,कारण मेंदू हा शरीराचाच एक पार्ट आहे.आणि बुद्धी व मन हे मेंदूची निर्मिती आहे.मेंदू मध्ये अनेक ग्रंथी ( नसा ) असतात,त्यातून स्त्राव निर्माण होतात,ते स्त्राव सकारात्मक किंवा नकारात्मक असतात,सकारात्मक स्त्रावामुळे चांगले विचार चांगल्या भावना,आणि नकारात्मक स्त्राव मुळे वाईट विचार आणि वाईट भावना निर्माण होतात,असे घडण्याचे कारण हे भौतिक असते.भौतिक म्हणजे कुटुंबातील , गल्लीतील,गावातील देशातील वातावरण,परिस्थिती.आणि संगती व शिक्षण यांचा परिणाम थेट शरीरावर आणि मेंदूवर होतो,म्हणजेच बुद्धी आणि मनावर पण होतो.म्हणून बाल अवस्थे पासूनच तरुण मनावर पण याचा दृढ परिणाम होतो,त्यानुसार माणसाचे विचार भावना तयार होतात.म्हणून भौतिक परिस्थिती ,वातावरण ( आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक ) जर विषमतेचे असेल तर माणूस विषमतावादी बनतो,आणि समतेचे असेल तर माणूस समतावादी बनतो.विषम परिस्थितीमुळे अनेक समस्या निर्माण होतात,आणि समतेची परिस्थिती वातावरण असेल तर अनेक मानसिक बौद्धिक समस्या निर्माण होणार नाहीत,थोडक्यात काय तर भौतिकतेचा परिणाम शरीर मेंदूवर होतो,परिणामी शारीरिक बौद्धिक मानसिक स्वास्थ्य बिघडते.म्हणजेच शरीराला बुद्धीला मनाला अनेक रोग जडतात.

       Sound mind in sound body अशी इंग्रजीत म्हण आहे,याचा अर्थ शरीर ठीक असेल,म्हणजेच रोगमुक्त असेल तरच मन ठीक असेल,म्हणजेच विचार भावना ठीक असतील.म्हणजेच माणसाचे शुद्धीकरण होय.

1.शरीराचे रोग…

 बाह्यरोग — शरीराचे बाहेरील अवयवाना झालेले रोग,म्हणजे डोके,डोळे, कान नाक घसा,पोट,हात पाय चामडी यांना झालेले रोग.

आंतरिक रोग —- म्हणजे शरीरातील आतील अवयव म्हणजे मेंदू रक्तवाहिन्या,किडनी,यकृत, फुप्पुसे,लहान व मोठी आतडी,इत्यादी.

      शरीरातील आतील आणि बाहेरील अवयवाना रोग का होतात ? याचे कारण वय,आहार,विहार, संगत,व्यसन,भौगोलिक वातावरण म्हणजे उन थंडी पाऊस वारा इत्यादी.

2.बौद्धिक रोग 

  शोषण,वर्चस्व,श्रेष्ठत्व,वंशत्व,भेदभाव, हे पाच रोग बुद्धीला झाले की, बुद्धी विषमतेचा विचार करायला लागते,आणि तशी व्यवस्था पण निर्माण करते,अर्थात अशी बुद्धी म्हणजेच अहंकार गर्व अभिमान होय.या बुद्धीस दुष्ट बुद्धी पण म्हणतात.आशिबुद्दीच शोषण करते, वर्चस्व गाजवित असते,सगळ्यांपेक्षा मीच श्रेष्ठ आहे,बाकीचे सारे नीच आहेत,असे मानते.अशा बुद्धीला वंशत्वचा घराण्याचा गर्व असतो,अशी बुद्धी माणसामाणसात भेदभाव करते,अपृश्यता मानते,स्त्रीपुरूष यात भेद करते.अशा बुद्धिस विकृत बुद्धी म्हणतात.आणि विकृत बुद्धीच विनाशाला कारणीभूत ठरते.विषमता ही विकृत बुध्दीची उपज होय.या बुद्धीचे लोक म्हणजेच दुष्ट दुर्जन लोक.

      बुद्धीचे हे रोग नाहीसे झाले तर माणसाला सम्यक बुद्धी प्राप्त होते.यास समतेची बुद्धी म्हणतात.अशा बुद्धीच्या लोकांना सद्गुणी सज्जन लोक म्हणतात.दया क्षमा प्रेम अहिंसा शांती सहयोग सहकार्य बंधुभाव न्याय स्वातंत्र्य ही मूल्य जोपासणारी ही बुद्धी ही माणसे असतात.अशीच माणसे संत महात्मे महामानव यांच्या मार्गावर चालतात.दुष्ट विकृत बुद्धीचे लोक राक्षसी प्रवृत्तीचे विकृत मनाचे असतात.म्हणूनच आपले वडवडील म्हणतात की,” सज्जनांच्या पायथ्याला बसावे पण दुर्जनाच्या उशाला पण बसू नये.” सुसंगती सदा घडो,सुजन वाक्य कानी पडो.

3.मनाचे रोग 

  जसे बुद्धीला रोग होतात,तसेच मनाला पण रोग होतात.मन संवेदनशील असते,ते चटकन काहीही चांगले असो की वाईट ते स्वीकारते.कारण त्याचा तो स्वभावच आहे.मन फारच हळवे आणि नाजूक असते,म्हणून काचेच्या भांड्याप्रमाणे त्यास जपावे लागते.ईछा,अभिलाषा, मोह,आकर्षण,भाव,भक्ती,भावना,विश्वास , या साऱ्या गोष्टी म्हणजे मनाचे तरंग होत.पाण्यावर जसे वाऱ्यामुळे तरंग उठतात तसे भौतिक वातावरणामुळे मनावर तरंग उठतात.आणि माणूस त्या लाटेवर झोके घेत असतो.वाहत जातो.अस्थिरता हा त्याचा गुण आहे,म्हणून त्याला स्थिर करण्याचा केविलवाणा प्रयत्न काही सज्जन करीत असतात,पण भौतिक परिस्थितीचा तो परिणाम आहे,हे त्यांच्या लक्षात येत नाही.भौतिक परिस्थिती जर विषमतावादी असेल तर कितीही देवधर्म,पूजापाठ,तीर्थाटन, तपस्या, अनुष्ठान, कीर्तन,भजन,विपश्यना करून काहीच फरक पडत नाही.काही वेळे साठी फरक दिसतो पण बरेच जण गळ्यातील तुळशीमाळ काढून खुंटीला अडकून ठेवतात,परत ये रे माझ्या मागल्या.यासाठी जो पर्यंत समतेची व्यवस्था प्रस्थापित होत नाही,तो पर्यंत मनाचा झोका हा हलतच राहणार आहे.यासाठी विचारवंत आणि सज्जन लोकांनी दया परोपकार,सुधारणा या मलम पट्ट्या करण्या ऐवजी व्यवस्था परिवर्तनाच्या कामी लागले पाहिजे.

        जो पर्यंत समाजात आदन्यानं,अंधश्रद्धा,असत्य आहे,जो पर्यंत माणूस वैज्ञानिक दृष्टिकोन,मानवतावादी दृष्टिकोन,आणि समतावादी दृष्टीकोन विचार स्वीकारणार नाही ,तो पर्यंत परिवर्तन घडणार नाही.विषमतेची व्यवस्था बदलणार नाही.समतेची भौतिक व्यवस्था निर्माण झाली तरच शारीरिक मानसिक बौद्धिक रोग नाहीसे होतील.

        लेखक : दत्ता तुमवाड

          सत्यशोधक समाज नांदेड

          दिनांक: 19 जुलै 2025.फोन: 9420912209.