शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला शालेय विदयार्थ्यांनी पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन केले.
यावेळी विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे च्या कार्याबद्दल माहिती,त्यांच्या खडतर प्रवासबद्दल व केलेल्या जागृती बद्दल माहिती देण्यात आली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे.
महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात.संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केले.



