वरील मनुवाद्याच्या,मानवताविरोधी आणि निसर्गविरोधी अर्थात संविधानविरोधी शक्तीच्या विरोधात एकट्याने कसं लढायचं हा आदर्श डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या अवघ्या 65 वर्षाच्या आयुष्याला समर्पित करून आम्हाला घालून दिला आहे.
आता शिका,संघठीत व्हा आणि संघर्ष करा हा मुलमंत्र दिलेला असताना सुद्धा आम्ही ( आंबेडकर अनुयायी ) हे सर्व करण्यात अपयशी ठरलो. आता या तत्वज्ञानाच्या प्रयोगाची अंमलबजावणी कुणीतरी करेल अशी वाट पाहण्यात 70 वर्षे घालवली.
केवळ आम्ही शब्दांच्या जंजाळात आणि फुगलेल्या पोटावरून हात फिरविण्यात आणि मोठ्याने जयभिम म्हणण्यात घालवली. म्हणून मनुवाद्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाणानंतर हीच संधी साधून संविधानाला नष्ट करण्याचा डाव साधला आहे.
आता राज / उद्धव एकत्र आल्यावर रामदास आठवले सारखे बरळत आहेत,की आम्ही सुद्धा एकत्र येऊ शकतो.अरे,दात आणि नखे गळून पडलेल्या आजारी सिंहाच्या तोंडावरची माशी सुद्धा उठत नसते.हा निसर्गनियम आम्हाला माहित आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत 65 वर्षाच्या आयुष्याच्या काळात त्यांना…
मनुवाद्यांनी सर्व बाजूनी अभिमन्यू सारखं घेरलेलं असताना आपल्या शील आणि विद्वता अर्थात चारित्र्याच्या बळावर मनुवाद्यांना सळो की पळो करून सोडले.तेंव्हा कुठे धम्मक्रांती आणि संविधानक्रांती यशस्वी होऊ शकली.
परंतू ,युगायुगाने होणाऱ्या अशा क्रांत्या टिकविण्यासाठी तशी पुढची पिढी सुद्धा निर्माण व्हावी लागते.परंतू ,तसे घडू शकले नाही.म्हणून मनुवाद्याचा जोर वाढून त्यांचे बटीक,गुलाम होण्याची वेळ या सर्वच आंबेडकर अनुयायी स्वतःला कार्यकर्ते,नेते,शिक्षक,प्राध्यापक,डॉक्टर्स,वकिल,अभियंता म्हणवून घेणाऱ्यावर आली.
हे मात्र केवळ लांडगा आला रे आला म्हणत केवळ टाळ्या पिटत राहिली. तो मनुवादी लांडगा कळपातील एक एक शेळी फस्त करत गेला आणि आम्ही मात्र केवळ उत्सुकतेने अजूनही टाळ्याच पिटत आहोत.
ही बघ्याची भूमिकाच आमच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही.
आम्ही आमचे सनदी अधिकारी,आमचे सरण्यायाधीश म्हणून हातभार छाती फुगवितो.परंतू ,हे सुद्धा संविधान नष्ट करण्याच्या मार्गांवर मनुवादी आलेले असताना सुद्धा,केवळ सहाच महिने मिळालेले असताना सुद्धा त्यातील दोन महिने तर सत्कार,समारंभातच घालविली.विधिमंडळात काय ( असंविधानिक ), जसे मोदीने गणपतीच्या आरतीला चंद्रचुड यांच्या घरी जाण्यासारखे……
यांच्याकडून संविधानरक्षणाची काय अपेक्षा करणार?
आता अशा बिकट परिस्थितीत प्रत्येक संविधाननिष्ठ,सर्वसामान्य जबाबदार नागरिक,विशेषतः प्रत्येक जबाबदार आंबेडकर अनुयायाने कुणाचीही वाट न पाहता,कुणाच्याही सहकार्याची वाट न पाहता,कोणत्याही संघटनेची वाट न पाहता,कोणत्याही नेत्यांची वाट न पाहता,कोणत्याही अवतारी महापुरुषाची वाट न पाहता स्वतःच्या नातवासाठी, भाविपिढीसाठी, देशाच्या सर्वांगीण अस्मितेसाठी या मनुवाद्यांना कायमचे घालविण्यासाठी आपल्या बौद्धिक आकलन क्षमतेनुसार वयक्तिक पातळीवर हा लढा लढला पाहिजे.भले त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल.
कारण कोणत्याही सार्वजनिक कार्याची सुरुवात स्वतःपासूनच करावी लागते.जशी बाबासाहेबांनी आणि भगवान बुद्धानी केली……
मी तर करणार,तुम्ही?


