Home Maharashtra महावितरण कडून ग्राहकांना भरमसाठ वीज देयके… — पुंडलिक गोठेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार...

महावितरण कडून ग्राहकांना भरमसाठ वीज देयके… — पुंडलिक गोठेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

      चंद्रपूर शहरासह ग्रामीण भागात ग्राहकांना महावितरण कडून भरमसाठ प्रमाणात वीज देयके येत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.देण्यात येणाऱ्या बिलात स्थिर आकार,वहन आकार, इंधन समायोजन आकार लावण्यात येत असून ही रक्कम अधिकची घेण्यात येत असल्याचे चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा तैलिक समाज भाई चारा रिपाई खो.चे अध्यक्ष पुंडलिक गोठे यांचे म्हणणे आहे.

       त्यांनी या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, पालकमंत्री डॉ.अशोक उईके व चंद्रपूरचे विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांना एक लेखी निवेदन सादर केले आहे.

        सदरहु समस्या कडे जातीने लक्ष पुरवून वीज ग्राहकांना योग्य न्याय देण्यात यावा अशी त्यांनी मागणी या निवेदनातून केली आहे.