Home Maharashtra लोतवाडा येथिल सरपंच व उपसरपंचासह दोन सदस्यांनी केले शासकीय जागेवर अतिक्रमण,सचिवाच्या अहवालानंतरही...

लोतवाडा येथिल सरपंच व उपसरपंचासह दोन सदस्यांनी केले शासकीय जागेवर अतिक्रमण,सचिवाच्या अहवालानंतरही अप्पर जिल्हाधिका-यांनी चार जणांना पात्र ठरविलेच कसे?

युवराज डोंगरे /खल्लार 

    उपसंपादक 

     दर्यापूर तालुक्यातील लोतवाडा येथिल ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व अन्य दोन सदस्यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केले व तसा अहवाल ग्रामपंचायत सचिव यांनी वरीष्ठाकडे पाठविला असतांनाही अप्पर जिल्हाधिकारी यांनी लोतवाडा येथिल चार जणांना पात्र ठरविले असल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

        मौजा लोतवाडा येथिल सरपंच सौ.दुर्गा सुधीर गावंडे 112 फूट,उपसरपंच ओंकार बबन कात्रे 32 फूट,ग्रामपंचायत सदस्य सुनिल मधुकर डोंगरदिवे 4 फूट रुंदी व 10 फूट लांबीच्या पायऱ्या,शुभांगी अतुल भदे 166 फूट या चारही जणांनी शासकीय जागेत नमुना 8 (अ) च्या व्यतिरिक्त अतिक्रमण केले आहे.

        या चारही जणांनी शासकीय जागेत अतिक्रमण केले असल्याचा अहवाल ग्रामपंचायत सचिव मंगेश देशमुख यांनी अप्पर जिल्हाधिकारी अमरावती व गटाविकास अधिकारी दर्यापूर यांना दिला.

         मात्र,अहवाल दिल्यावरही अप्पर जिल्हाधिकारी गोविंदा पाणेज यांनी चारही सदस्यांना पात्र ठराविल्याचा आदेश काढला.

       याउलट चांदुर बाजार तालुक्यातील एका ग्रामपंचायत सदस्याने शासकीय जागेत अतिक्रमण केल्यामुळे त्याला अपात्र ठरविले.लोतवाडा येथिल चार जणांना पात्र का म्हणून ठराविले? याबाबत अप्पर जिल्हाधिकारी गोविंदा पाणेज यांच्या कार्यपद्धतीवर शंका व्यक्त केल्या जात आहे.

प्रतिक्रिया…. 

    अप्पर जिल्हाधिकारी यांनी नशेत आदेश काढला काय?सचिवाच्या अहवालावरुन चांदुर बाजार तालुक्यातील कुरळ पूर्णा येथिल ग्रामपंचायत सदस्य मंदा पोहणे यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केल्याबद्दल अप्पर जिल्हाधिकारी गोविंदा पाणेज यांनी त्यांना अपात्र ठराविले.मात्र दर्यापूर तालुक्यातील लोतवाडा येथिल सरपंच,उपसरपंच व अन्य दोन सदस्यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केले व तसा अहवाल सचिव यांनी दिल्यावरही अप्पर जिल्हाधिकारी यांनी चारही जणांना पात्र ठरविलेच कसे?अप्पर जिल्हाधिकारी पाणेज हे लोतवाडा येथिल आदेश काढताना नशेत होते काय? अशा गंभीर स्वरूपाच्या भावना तक्रारदारांनी व्यक्त केल्या आहेत…

भिमराव कुऱ्हाडे 

   तक्रारकर्ता