Home Maharashtra स्टेट बँकेतील के.वाय.सी करणारा कर्मचारी आठ दिवसापासून गायब, नागरिकांना हेलपाटे…

स्टेट बँकेतील के.वाय.सी करणारा कर्मचारी आठ दिवसापासून गायब, नागरिकांना हेलपाटे…

युवराज डोंगरे /खल्लार 

        उपसंपादक 

      दर्यापूर येथिल स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतील के. वाय. सी करणारा कर्मचारी गेल्या आठ दिवसांपासून गायब असल्याने संजय गांधी योजना, श्रावण बाळ यासारख्या निराधारांसाठी असलेल्या योजनाचे अनुदान के. वाय. सी नसल्यामुळे रखडले आहे.

       दर्यापूर तालुक्यातील शेकडो नागरिकांना निराधार अनुदानाची रक्कम सहा महिन्यापासून खात्यात जमा झाली नाही. ज्यांच्या खात्यात जमा झाली त्यांना त्यांच्या खात्याची के. वाय. सी करणे अनिवार्य आहे. याबाबत दररोज कित्येक नागरिक पैसे कधी येणार म्हणून तहसिल कार्यालयात विचारना करण्यासाठी येतात.त्यांना खात्याची के. वाय. सी बँकेतून करुन घ्या असे सांगण्यात येते. बँकेत गेल्यावर के. वाय. सी करणारा कर्मचारीच मागिल आठ दिवसापासून गायब असल्याने नागरिकांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत.

        शाखेतील एखादा कर्मचारी गैरहजर असेल तर त्या ठिकाणी दुसरा कर्मचारी बसवून काम करता येते परंतु दर्यापूर शाखेतील शाखाधिकारी तसे करीत नाहीत त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.