शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
मागील आठ दिवसापूर्वी चिमूर तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने मोठमोठी झाडे पडली, घरांची पडझड झाली,टिनांचे शेड उडाले,विजेचे विजेचे पोल पडले,त्यामुळे परिसरात बरीच नुकसान झाली होती.
वीज पूर्ववत करण्यासाठी महावितरण ला बरीच कसरत करावी लागली असून महावितरणने गावातील विद्युत पुरवठा सुरळीत केला.परंतु शेतीच्या विद्युत पुरवठ्याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यामध्ये चिंतेचे सावध पसरले आहे.
शंकरपूर परिसरातील जवराबोडी साठगाव हिवरा वाकरला कोलारी चिचाळा (कुणबी) इत्यादी गावातील शेतकऱ्यांच्या विद्युत पुरवठा आठ दिवसापासून खंडित असल्याने ऐन खरिपाच्या हंगामावर शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे.
परिसरात काही शेतकऱ्यांनी धान,सोयाबीन,कापूस,इत्यादी पिकाच्या पेरण्या केल्या असून पावसाने दडी मारल्याने पिके वारण्याच्या स्थितीत आहेत. पाण्याची व्यवस्था असून सुद्धा विद्युत नसल्याने पेरलेली पिके सुकण्याच्या अवस्थेत आले आहेत.
त्यामुळे या परिसरातील विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरू करण्यात यावा,यासाठी या परिसरातील शेतकरी तसेच अध्यक्ष कृषी शेतकरी मित्र कमलाकर ठाकरे व वंचित बहुजन पक्ष जिल्हाप्रमुख शुभम मंडपे यांनी महावितरण शाखा शंकरपूर चे इंजिनियर खोब्रागडे यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे.



