Home देशविदेश तुलनात्मक वैचारिक लेखमाला केवळ भारतीय जनतेसाठीच….. — भाग = 0019…

तुलनात्मक वैचारिक लेखमाला केवळ भारतीय जनतेसाठीच….. — भाग = 0019…

रामदास आठवले शेवटी रामाचाच दास झाला…….

       जोगेंद्रने कवाडे यांनी शेवटी जोगवाच मागितला..

कधीकाळी…..

    “रामदासाची दहशत आहे, भल्याभल्याच्या मनात. अन वाघाप्रमाणे नित्य उतरतो न्यायासाठी रणात….

     बुद्धीबळाने,युक्तीवादाने गाजवले किती आखाडे,सरकारलाही घाबरून सोडी,तो जोगेंद्र कवाडे….

     कवी/गायक विष्णू शिंदे….

     एकेकाळी या गीताने सर्वच दलित आंबेडकरी नेत्यांना एकत्र आणून आपली शक्ती दाखवून लोकसभेत चौघानी समोरच्या दाराने प्रवेश केला होता!

       परंतू ,तेच आज मनुवाद्याच्या, संविधानविरोधी शक्तीच्या कुशीत जाऊन स्थिरावले आणि बघता बघता वाघाचे मांजर कधी झाले हे त्यांनाही कधी समजलेच नाही.समाजाने त्यांना मात्र लगेच ओळखले.

     समाजाला आता खरा प्रश्न पडतो की खरोखरच ही मंडळी कधीकाळी स्वाभिमानी आंबेडकरवादी होती काहो?

   या प्रश्नाचे उत्तर नाही, नव्हते असेच येईल……

कारण…….

       एवढे मात्र निश्चित की,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकारणी कसा ओळखावा यांची जी व्याख्या केली आहे, ” नरम,गरम आणि बेशरम तो राजकारणी. ” यांच्यामध्ये परिपूर्ण बसणारे हे आणि असे आजचे दलित नेते आहेत.

      “जर येत्या 14 एप्रिल पर्यंत मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव नाही दिले,तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन. ” याच्या शब्दात स्वाभिमानच नव्हता.म्हणून तर शेवटी……

    शहीद गौतम वाघमारे यांना शहीद व्हावेच लागले ना.!

     शेवटी तुमच्या त्या पोकळ आणि नाटकी स्वाभिमानावर गौतम वाघमारेचा विश्वासच नव्हता!

      आणि आज 2025 काळ येई पर्यंत तुम्हीच त्याच्यावर शिक्कामोर्तब केले.

    तुम्ही तर मोदींचे अंधभक्त होऊन आंबेडकरी समाजाची दिशाभूल केली…

   अरे,रामदासा…..

     ज्या राज्यसभेतून आमच्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमाने हिंदू धर्माचा त्याग करण्याची 1935 ला येवला येथे घोषणा केल्यानंतर त्याच धर्मातील स्त्रियांची गुलामगिरी हटविण्यासाठी “हिंदू कोडबील ” तयार केले.ते राज्यसभेत सादरच करू न दिल्याने त्या बिलाचे कागद सभागृहात सभापतीच्या तोंडावर भिरकावून कायदेमंत्रिपदाचा ताबडतोब राजीनामा देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

        आणि त्यांच्याच भीमक्रांतीमुळे तू राज्याचा आणि आता केंद्राचा सामाजिक न्यायमंत्री होऊन सुद्धा त्याच राज्यसभेत त्याच खुर्चीत बसून विडंबन काव्य करतोस…..

       तू कधीतरी आंबेडकरवादी होतास हा आमचा गैरसमज होता. आता तू मोदीभक्त संविधानविरोधी झालास यातच तुझे….

      म्हणून आंबेडकरी समाज तुला कधीही माफ करणार नाही…

          ज्यांनी मराठवाडा विद्यापीठाला आमच्या अस्मितेचे नाव देण्यासाठी नागपूर ते औरंगाबाद लॉंगमार्च काढला आणि प्रणेते झाले.समाजाला झोपेतून खडबडून जागे केले. आंबेडकरी चळवळीसाठी ज्यांनी प्राध्यापकी नोकरी सोडली.तेंव्हा खरोखरच त्यांचा स्वाभिमान समाजाला होता.त्यांच्या आक्रमक भाषणाला ऐकुन समाज जातीवाद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरण्यास सिद्ध व्हायचा.असे जोगेंद्र कवाडे आज त्यांना कोणती उपरती आली?

        त्यांना आणि त्यांच्या कुपुत्राला गोळवलकर गुरुजी आदर्श वाटत आहेत!

      दीक्षाभूमी ऐवजी आता रेशीमबाग त्यांना जवळची वाटते!

   अरे,तुमचा नकली आंबेडकरी स्वाभिमान समाजाला कधीच समजला.

        परंतू ,समाज हा आजही,पूर्वीही आणि यापुढेही स्वाभिमानी आंबेडकरवादीच होता,आहे आणि राहील…

      त्यासाठी तुमच्या लाचारीला भीक घालणारा समाज नाही.

     आता आम्हीच आमचे रक्षक होणार आणि राज्यातील देशातील संविधानविरोधी शक्तीला कायमचे उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आम्हाला कोणत्याही नेत्यांची गरज अजिबात नाही.कारण आमच्यासाठी आमच्या बापाने लिहून ठेवलेले संविधान आहे.”बस!

   तेंव्हा तुमच्यासारख्या थुकलेलं चाटणाऱ्या नेत्यांची आम्हाला मुळीच गरज नाही.

      कारण,आम्ही भारताचे लोक स्वतःप्रत अधिनियमित करून अंगीकृत करणार आहोत.

       जागृतीचा कृतिशील लेखक

        अनंत केरबा भवरे

संविधान विश्लेषक, 7875452689…