भारत पाकिस्तान युद्धाबद्दल मी शांतपणे विचार करायला लागलो,एक जागृत भारतीय नागरिक म्हणून.
तेंव्हा मी गोंधळलो,वाटायला लागले,आम्हाला युद्ध करायचे नव्हते ,तर फक्त आम्हाला बदला घ्यायचा होता,अतिरेक्यांचा,ज्यांनी आमच्या देशात घुसून आमच्या 26 नागरिकांची गोळ्या घालून हत्या केली,म्हणून आम्ही अतिरेक्यांचे पाकिस्तानात घुसून 9 अड्डे उध्वस्त केले.यात यश मिळाले.एव्हढ्यावरच आम्हाला थांबायचे होते,परंतु पाकिस्तानी सैन्य यात पडायला नको होते,कारण दहशतवादी आमचे नव्हेत,त्यांचे विचार आणि कार्य आम्हाला पटत नाही,असे पाकिस्तान सरकार साऱ्या जगाला सांगत असते,तर मग आम्ही दहशत वादी चे अड्डे उध्वस्त करीत असताना पाकिस्तानी सैन्याने मधे पडायला नको होते,आमची दोन तीन विमाने पाडली,आधी सूचना न देता, आमच्याशी युद्धच करायचे तर आधी उद्याच्या हालचाली करायला हव्या होत्या,किंवा आम्हाला सूचना द्यायला हवी होती की,” तुम्ही दहशतवाद्यांवर कार्यवाही करण्यासाठी आमच्या देशात तुम्हाला परवानगी नाही,तसे केल्यास आम्ही गप्प बसणार नाही ” असे न सांगता अचानक युद्ध कार्यवाही केली,हे पाकिस्तानचे चुकले.आम्ही पण गप्प न बसता पाकिस्तानी सैन्य कारवाहीला तोंड देण्यासाठी युद्ध पुकारले.दोन्ही बाजूने युद्ध सुरू झाले.इथे आपले पण चुकले असे मला वाटते,कारण अमेरिका यात हस्तक्षेप केल्यानंतर आपणास युद्धबंदी करावी लागते,हे माहीत होते,तर मग युद्ध करायची जरूरी नव्हती,आपली नुकसान करून घ्यायची जरूरी नव्हती,सैन्याचा बळी द्यायची गरज नव्हती.किंवा ट्रम्पचा आदेश धमकी ला भीक घालायची नव्हती.( मागील युद्धाप्रमाणे ) दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करून गप्प बसायला हवे होते,उलट पाकिस्तान आम्हाला दहशतवाद नष्ट करण्यात कसे अडथळा करीत आहे , हे जगाला दाखवून देता आले असते,असे सांगून अनेक देशाला आपलेसे करता आले असते,याचा उपयोग भावी लढाईसाठी झाला असता,शिवाय भारताचे परराष्ट्रीय धोरण हे शेजारी राष्ट्रांच्या बरोबर युद्ध करायचे नाही,शांतता राखायची हे आहे,हे सिद्ध करता आले असते.अतिरेक्यांचा बदला घेऊन गप्प बसायला पाहिजे होते,युद्धास तोंड द्यायला नको होते,कारण युद्ध पाकिस्तानला हवे आहे,पण आम्हाला नको आहे,हे आपले धोरण साऱ्या जगाला सिद्ध करून दाखविता आले असते,परंतु अखंड भारताचे स्वप्न साकार करायची ही वेळ आली, ती दवडता काम नये,असे कदाचित बीजेपीचे धोरण असल्याने हे युद्ध भारताने केले असावे,असे असेल तर मग ट्रम्प चे दबावाला बळी पडायला नको होते, तसेच हे सारे आपल्या सैन्यावर सोडले होते,तर सैन्यालाच निर्णय घेण्याचा अधिकारी होता, तो पंतप्रधानांनी परत का घेतला? असा प्रश्न पडतो.आता पर्यंत शेजारी राष्ट्राची जी काही युद्धे झाली, ती आपण पुकारली नव्हती,त्यांनीच चॅलेंज दिल्याने किंवा शेजारी राष्ट्रांच्या विनंती मुळे आपण युद्धे केलेली आहेत,तरी मागच्या युद्धात आपण जिंकलो तरी त्यांचा देश ताब्यात घेण्याचा उद्देश नव्हता,तर स्वसंरक्षण करण्यासाठी युद्धे केली.रामप्रभूने लंका जिंकली तरी ती ताब्यात घेतली नाही,ही आपली परंपरा बंधुभाव आणि सहकार्याची आहे,म्हणून आपण युद्ध थांबविले असे नसून इतर कुणाच्याही दबावास बळी पडू नये,ही पण परंपरा आहे,ही या युद्धात मोदींनी मोडली आहे.यामुळे आपण कमकुवत आहोत,आपण व्यापारी आहोत,दुसऱ्याच्या दबावा पुढे शत्रुपक्षाशी दोन हात करू शकत नाही,ही प्रतिमा साऱ्या जगात निर्माण झाली.
सर्वपक्षीय शिष्टमंडळ काही देशात जाऊन ” आम्ही सर्व एक आहोत,आमचे अंतर्गत पक्षीय काहीही मतभेद असले तरी राष्ट्रासाठी एक आहोत,दहशतवाद गाढुन टाकण्याचे भारताचे स्वप्न आहे.” केवळ एव्हढेच सांगण्यासाठी पाठवले,यावर खर्च करायची गरज काय होती,हे सांगण्याची तर गरज काय होती ? दहशत वादी हल्ला करण्यासाठी सर्वपक्षीय सहमती झाली,हे साऱ्या जगाला आधीच माहीत करून दिलो होतो.सर्व विरोधी पक्षांनी या शिष्टमंडळास विरोध करायला हवा होता, तो केला नाही,त्यांच्या खर्चाचा लाखो रुपयाचा बोजा देशावर करून ठेवला,इकडे तर मोदीजी ट्रम्पचे ऐकून युद्ध थांबविले,दबावाला बळी पडले,असे देशात जनतेला सांगत आहेत,पण हेच सांगणे इतर देशापुढे या शिष्टमंडळाने सांगितले नाही,इथे विरोधकांची दुटप्पी भूमिका दिसते.हे बरोबर नाही.
या युद्धापासुन आपण काय धडा घ्यावा ? हा प्रश्न पडतो . कारण ज्यावेळी अतिरेकी आपल्या देशात घुसले ,तेंव्हा बॉर्डरवरचे जवान यांनी का अडविले नाही ? आणि आतमध्ये 300 किलोमीटर येताना गृहखात्याचे जवान हे काय करीत होते ? त्यांना का पकडले नाही ? पर्यटकांना संरक्षण द्यायला पाहिजे होते ते का दिले नाही ? दहशत वादी एव्हढे जीव घेतात आणि देशातच लपून बसतात ,तर सी.आय.डी खाते का झोपले आहे ? दहशत वादी इथे नसतील तर मग पळून जाताना का पकडले नाही ? हे सारे प्रश्न जनता विचारू नये, म्हणून अतिरेकी हल्ला करण्याचा निर्णय घेतला असावा,की जेणे करून आपली चूक जनतेच्या लक्षात येऊ नये,विरोधी पक्षांनी रान उठवू नये,म्हणून हल्ल्याचा निर्णय घेतला असावा,अशी शंका घेणे रास्त आहे.
स्वसंरक्षणासाठी जे काही करायला हवे होते,ते झालेच नाही,ज्यांनी आपले जीव घेतले त्यांना पकडले की नाही ? हे ही अजून कळाले नाही,दहशतवादी अड्डे पाकिस्तानात 100 आहेत,असे पाकिस्तान सांगते,त्यातील दहाच नष्ट केले,तसेच आपण आधीच हल्ल्याचा गवगवा केल्यामुळे त्या अड्ड्यातील दहशतवादी आधीच तेथून निघून गेले असणार,मग अड्डे उध्वस्त करून काय उपयोग ? दहशतवादी तर मारले गेलेच नसणार ,मारले गेले तर किती कुठे ? याचा अधिकृत आकडा आपणही देत नाही,आणि पाकिस्तान ही देत नाही,याचा अर्थ दहशतवादी शिल्लक आहेतच.समजा ते जरी शिल्लक नसले तरी,पाकिस्तानचा हा सारा खेळ आहे,त्यामुळे प्रत्यक्ष पाकिस्तानच ताब्यात घेतल्याशिवाय दहशतवाद कधीच नष्ट होणार नाही,हेही सर्वच राजकीय पक्षांना बीजेपी सहित माहीत आहे,तर मग सऱ्या जगाला आणि विशेष म्हणजे ट्रम्पला हे समजून का सांगत नाही ? हा प्रश्न पडतो.एक तर पाकिस्तान आम्हाला जिंकून घेऊ द्या,किंवा त्यावर सर्व देशांनी दहशतवाद बंद करण्यास सांगा,नाही ऐकत तर आम्हास युद्धासाठी मदत करा.कारण दहशतवाद हा जगापुढील एक संकट आहे,हे सर्वच देश म्हणत आले आहेत.या युद्धात तर आपणास आनी पाकिस्तानला पण कुणीच मदत केली नाही.असे का होते ? हा पण प्रश्न आहेच
यासाठी भारताचे धोरण आधी स्पष्ट असले पाहिजे,ते हे की,दहशतवाद हा पाकिस्तान जोपासत आहे,त्याचा उपयोग आमच्यावर हल्ले करन्यायासाठी करीत आहे,म्हणून त्यालाच आम्ही जिंकून घेणार,किंवा पाकिस्तानातील तीनचार राज्य स्वतंत्र होऊ पाहत आहेत,ही संधी समजून त्यांना मदत करून पाकिस्तानचे तीन तुकडे करणार,अशी ठाम भूमिका पाहिजे,कारण समजून सांगूनही ऐकायला तयार नाही,तर मग युद्धच पुकारले पाहिजे.ही भूमिका ट्रम्पला सांगावी,त्यास आपली भूमिका मान्य नसेल तर आपल्याशी तो व्यापार बंद करण्याची भीती घालतो,ते चॅलेंज स्वीकारले पाहिजे,त्याच्या ऐवजी चीन रशिया यांची दोस्ती करून व्यापार वाढवला पाहिजे.पण ट्रम्प चे न मानता पाकिस्तान जिंकून घेऊन हा दहशतवादाची कीड एकदाची नाहीशी केली पाहिजे.
पाकिस्तान अणुबाँब ची भीती घालेल, ती सर्व जगाचा चिंतेचा विषय असेल ,तेंव्हा आपोआपच सारे देश पाकिस्तानला अणु बॉम्ब नष्ट करण्याची धमकी देतील.ते त्याला करावेच लागेल.अणुबाँब चे वापर करू नये. हे युनो राष्ट्र संघटनेचाच ठराव आहे,त्यामुळे ते सारे भारतास सपोर्ट करतील.हे सामान्य जनतेला कळतेय पण पंतप्रधान मोदीला मान्य नाही,कारण मोदी हे योद्धा नाहीत तर ते एक व्यापारी आणि भित्रे आहेत.परंतु त्यांच्या ह्या कचखाऊ धोरणामुळे देशाची किती किती जीवितहानी, सैन्याची हानी,सैन्य खर्च वाढतो आहे,हे जनतेनी लक्षात घेणे जरुरीचे आहे,
स्वसंरक्षण , दहशतवाद,पाकिस्तानशी युद्ध या बद्दल एक ठोस भूमिका मोदीजी घेतील एव्हढीच अपेक्षा.



