ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : नुकत्याच पिंडकेपार वरून गाजलेल्या “पे टू पे” दान घ्या या “बंटी बबली” फसवणूक प्रकरण नंतर आता पुन्हा “व्हाईस ऑफ दर्पण” या महिला योजनेच्या नावाखाली अनेक महिलांनी पैसे गोळा करून मुख्य कार्यालय गुजरातला पाठविले. परंतु १ वर्ष लोटूनही काहीच फायदा नाही हे बघून आता त्या महिला संतापले. अखेर यांची चौकशी करण्यात यावी यासाठी साकोलीत बुधवारी ता. ११ जूनला पिडीत महिलांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केला आणि यांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
“देश का सबसे बडा आर्थिक सर्व्हे – व्हाईस ऑफ योजना दर्पण प्रेस” असे सोशल मिडीयात गुजरात मधून आँनलाईन माहिती आली होती. यात महिलांना अनुदान ५० हजार देण्याचे प्रलोभन दाखविले. प्रत्येक महिलांकडून नेमलेल्या एजंट तर्फे प्रत्येकी २०० रू वसुली करून गुजरातला ती रक्कम नामे “क्लिअर व्हीजन फाऊंडेशन – नं. ५०२०००७९४७३५०१ या एचडीएफसी बॅंक खात्यात पाठविली. पाहीले असता एकट्या साकोली तालुक्यातील ४० हजार महिलांनी याचे फार्म भरले आहेत.
म्हणजेच येथून ८० लाख याचप्रमाणे अन्य तालुके, भंडारा गोंदिया जिल्हा आणि अख्ख्या महाराष्ट्रातून किती महिलांकडून २०० रू. घेऊन ही रक्कम किती गोळा केली असेल याचा अंदाज लावणे कठीण आहे. आता दिड ते दोन वर्षे लोटूनही काहीच फायदा नाही म्हणून त्या पैसे दिलेल्या महिला या स्थानिक वॉलेंटीयर महिलांना वारंवार घरी जाऊन बोलल्या.
आता या महिला मानसिक तणावाखाली आल्याने त्यांनी काल ( बुधवार ११ जून ) साकोलीत येऊन पत्रकार परिषदेत आरोप केला आणि यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. यात निशा युवराज उदापुरे रा. खजरी/डोंगरगाव तह. सडक अर्जूनी व भाग्यश्री नेपाल रा. रेंगेपार/दल्ली दोन्ही जिल्हा गोंदिया व योगिता हंसराज रामटेके रा. सावरबंध ता. साकोली ह्या हजर झाले होते. असे भरपूर पिडीत महिला आहेत असे त्यांनी पत्रपरिषदेत माहिती देत सांगितले की, त्यांनी आम्हाला म्हणाले की “लाडक्या बहिणींना याच याच योजनेतून पैसे दिले जातात” असे महिलांना सांगा व फॉर्म भरा. शेवटी आम्ही यात फसलो आहोत. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशीची त्यांनी मागणी केली आहे.
आता एका तालुक्यातून ४० हजार महिलांनी ८० लक्ष रुपये दिले. असे पाहता अन्य तालुके, जिल्हा व नंतर महाराष्ट्र आणि मग भारतातून ही “व्हाईस ऑफ दर्पण” नावाखाली अशी किती कोट्यावधींची, अब्ज रूपयांनी संपत्ती जमविलेली आहे ते आता सखोल चौकशीअंतीच समोर येईल. पण सध्या असंख्य पिडीत महिला जागृत झाल्या असून या योजनेचा मुळ हेतू उद्देश काय आहे हे त्यांच्याही न समजण्यासारखे आहे. हे एक प्रकारचे फसवणूक रॅकेट तर नाही अशी शंका पिडीत महिलांनी उपस्थित केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर पोलिसांना पत्र..
याप्रकरणी या “व्हाईस ऑफ दर्पण” ब्युरो चीफ नागपूरच्या एका जागृत व्यक्तीने दि. २०/०२/२०२५ ला याबाबद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, २९/०३/२०२५ रोजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ०३/०२/२०२५ ला पोलीस आयुक्त सिव्हिल लाईन्स नागपूर व १८/०२/२०२५ ला पोलीस उपायुक्त वर्धमान नगर नागपूर येथे तक्रारी पत्र दाखल केले. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्र नागपूर पोलिसांना पोहचले. म्हणून २९/०३/२०२५ ला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत भागवत – पोलीस ठाणे पारडी, नागपूर यांनी हे प्रकरण चौकशी करून निकाली काढण्यासाठी पत्र दिले. यात गैरअर्जदार मोहित वालिया रा.मु.पो. रातलानी ता. महेंद्रगढ ( हरीयाणा ) आणि दर्शना डाभी भावनगर ( गुजरात ) यांच्या नावाचा या तक्रारीत नमूद केले आहे. व हे प्रकरण न्यायालय स्वरूपात असून त्यांचे बयाण घेऊन प्रकरण चौकशीसाठी पोलीसांनी ठेवले आहे.


साकोली मिडीया” या सोशल मिडीयातून मागील वर्षी ७ जून २०२४ ला प्रकाशित केली होती ही जनहितार्थ बातमी..



