Home Maharashtra चिमूर तालुक्यात वादळी पावसाचे आगमन… — विजांचा कडकडाट भिती निर्माण करतो...

चिमूर तालुक्यात वादळी पावसाचे आगमन… — विजांचा कडकडाट भिती निर्माण करतो आहे.

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

            चिमूर तालुक्यामध्ये आज दिनांक 10 जून 2024 रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आलेल्या सुसाट वादळासह विजांच्या कडकडाटात पावसाने जोरदार सुरुवात केली.

        त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.या वादळाने अनेक ठिकाणी मोठमोठे झाडे विद्युत पोलवर पडलेले असून विद्युत पुरवठा ठप्प झालेला आहे. 

        अनेक ठिकाणी विजांच्या तारावर झाडे पडल्यामुळे महावितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले असून विद्युत सेवा पूर्ववत करण्यासाठी महावितरणला तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

         तर तालुक्यातील जनतेला काळोखा मध्ये रात्र काढावी लागेल की काय?अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

           वादळी वाऱ्यासोबतच विजेचा कळकळाट होता.विद्युत पुरवठा खंडित झाला असतानाही जिकडेतिकडे विजेच्या कडकड्यांचा लख्ख प्रकाश पडत होता.काल सायंकाळची वेळ असल्यामुळे वित्तहानी व जिवीत हानी किती झाली याची माहिती प्राप्त होऊ शकली नाही. 

           परंतु या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे तसेच गावातील नागरिकांचे किती नुकसान झाले याचा अनुमान सध्या तरी लावता आलेला नाही.बऱ्याच महामार्गावर व रस्त्यावर मोठ-मोठी झाडे पडली असल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झालेली होती. 

         या वादळी वाऱ्यासोबतच पाऊसही मोठ्या प्रमाणात झाल्याने घरांचे तसेच शेतीचे किती नुकसान झाले असल्याचा अनुमान सध्या तरी लागलेला नाही…

        मात्र,लखलखत्या विजेच्या तांडवाने नागरिकांत जिकडे तिकडे भिती निर्माण झाली आहे..