ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली :- शामराव बापू कापगते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था साकोली येथे, आयोजित शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा व्हिडिओ संदेश तसेच मंत्री श्री.मंगल प्रभातजी लोढा यांचा व्हिडिओ संदेश उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना टीव्ही स्क्रीनवर दाखवण्यात आले.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून, श्री.अरुणजी गुप्ता उद्योजक साकोली, तथा संस्था व्यवस्थापन समिती हे लाभले. सदर कार्यक्रमास श्री. गुलाबजी कापगते सामाजिक कार्यकर्ता विशी यांनी स्वदेशी विचारांचा प्रचार व प्रसार या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच श्रीमती आशाताई बोरकर प्राचार्य करंजेकर कनिष्ठ महाविद्यालय एकोडी यांनी सामाजिक समरसता व कुटुंब प्रबोधन या विषयावर आपले विचार व्यक्त केले. आणि श्री.आनंद ई. सोनवाने सामाजिक कार्यकर्ते सदस्य संस्था व्यवस्थापन समिती यांनी पण व्यसनमुक्ती व वाईट व्यसन याबद्दल यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रम प्रसंगी श्री. राहुलजी आगलावे, श्री. सागरजी पुस्तोडे, यांच्या प्रमुख उपस्थिती होती. या सर्वांनी समायोजित विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सर्वसाधारण प्राचार्य श्री. जी. आर. दहापुते यांनी केले, कार्यक्रमाचे संचालन विकास देशमुख यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी करिता श्री. कार्तिक लाडे, राजेश बाडकर, श्रीमती. कारंडे मॅडम, वैद्य मॅडम, कोवे मॅडम, श्री. तुमसरे सर, नाशिक रामटेके, केदारसिंग सोलंकी, मंगेश वसुले, दिवाकर बोरकर, आकाश लाडे, ओजस्वी भांडारकर, यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुनील राईकवार यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.



