Home Maharashtra कुंभा येथे वारकरी बाल संस्कार शिबिराचे भव्य आयोजन…

कुंभा येथे वारकरी बाल संस्कार शिबिराचे भव्य आयोजन…

     रोहन आदेवार

 जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ 

मारेगाव: वारकरी परंपरेची अमूल्य शिकवण पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि बालकांमध्ये आध्यात्मिक व नैतिक मूल्यांचे संस्कार बिंबविण्यासाठी, श्री शिवपवन एकपान जागृत देवस्थान, कुंभा (ता. मारेगाव, जि. यवतमाळ) येथे १ मे ते १५मे २०२५ या कालावधीत “भव्य दिव्य वारकरी बाल संस्कार शिबिर” आयोजित करण्यात आले आहे.

         या शिबिरात विद्यार्थ्यांना वर्तनशुद्धी, हरिपाठ, अभंग शिक्षण, साधुसंतांच्या प्रेरणादायी कथा, गोफण फेक, पारंपरिक खेळ, सविधानिक मूल्य, गीता ज्ञान, शिस्त व सामाजिक बांधिलकी यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मोबाईलपासून दूर राहून नामस्मरण व साधना यावर भर दिला जाणार आहे.

          सर्व मुलांना राहण्याची, भोजनाची व शिबिर साहित्याची संपूर्ण व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर शिबिरामध्ये मार्गदर्शक,नामांकित गायक, वक्ते व संस्कार शिक्षक शिबिरात सत्र घेणार आहेत. शिबिरा दरम्यान विविध मान्यवर आपली उपस्थिती दर्शवणार आहे.

         शिबिराच्या शेवटच्या दिवशी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व पालक व ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क:

भागवताचार्य ह.भ.प प्रशांतजी क्षीरसागर आळंदीकर  8379864883