शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
वाघ व इतर वन्यर्जीवाच्या हमखास दर्शनासाठी जग प्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत दिनांक १२ मे २०२५ ला बफर क्षेत्रात बुद्ध पौर्णिमेला निसर्गानुभव उपक्रम निसर्ग प्रेमीसाठी राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी बफर क्षेत्रातील चंद्रपूर,मूल,मोहर्ली,खडसंगी,पळसगाव व शिवणी या सहा वनपरिक्षेत्रातील ५० मचाणी सज्ज करण्यात आलेल्या आहेत.निसर्ग प्रेमीकरिता ताडोबातील वन्यजीवन मचाणीवर बसून अनुभवण्याची ही सुवर्ण संधी आहे.
या प्राणीगणनेमध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक २८/४/२५ ते ५/५/२०२५ या कालावधीत http://mytadoba.mahaforest.gov.in/ या संकेत स्थळावर बुकिंग सुरु होणार असून एकूण १०० निसर्गप्रेमी यामार्फत बुकिंग करू शकतात.सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी प्रती व्यक्ती रु. ४५००/- इतके शुल्क आकरण्यात येणार आहे.
सहभागी होणाऱ्या पर्यटकांनी संकेतस्थळामार्फत रु.१५००/ अदा करून भरलेल्या रकमेची पावती सबंधित पर्यटन गेटला दाखवावी. उर्वरित रकमेमध्ये जिप्सी शुल्क रु. २०००, पर्यटन गेट ते मचाण प्रवास खर्च व मार्गदर्शक शुल्क रु. १००० इतके सबंधित पर्यटन गेटवर रोख स्वरूपात देण्यात यावे.
सहभागी होणाऱ्या निसर्गप्रेमींनी शाकाहारी जेवणाची व पाण्याची व्यवस्था स्वतः करावी तसेच कॅमेरा व सर्चलाईटला सदर उपक्रमामध्ये परवानगी नाही. इतर माहितीकरिता वरील संकेत स्थळावर भेट देण्यात यावी.
सदर उपक्रमाविषयी काही अडचणी असल्यास कार्यालयीन वेळेस श्री.सुमित कोहळे, 8421461698 (सहाय्यक पर्यटक व्यवस्थापक, उपसंचालक बफर कार्यालय, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्प यांनी केले आहे.



