Home Maharashtra कास्ट्राइब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेची नवीन कार्यकारिणी… — गौतम मेश्राम यांची...

कास्ट्राइब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेची नवीन कार्यकारिणी… — गौतम मेश्राम यांची अध्यक्षपदी,दीपक मांडवे सचिवपदी निवड…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

            वृत्त संपादिका 

         गडचिरोली येथील जंगल कामगार सोसायटी हॉलमध्ये कास्ट्राइब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गडचिरोली परिवहन विभागाच्या असोसिएशनची नवीन कार्यकारिणी दोन वर्षांच्या कालावधीसाठी (२०२५ – २०२७) निवडण्यात आली.

         या बैठकीत श्री. गौतम मेश्राम यांची अध्यक्षपदी आणि दीपक मांडवे यांची सचिवपदी निवड करण्यात आली. निवड झालेले इतर पदाधिकारी – कार्याध्यक्ष- प्रदीप तेलसे, उपाध्यक्ष- धनराज मोहुर्ले, कोषाध्यक्ष- अरुण इंगोले. सल्लागार म्हणून सामाजिक कार्यकर्ते रोहिदास राऊत यांची निवड करण्यात आली.

          राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे प्रादेशिक सचिव उदयभान मालाधरे यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले तर ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते रोहिदास राऊत, प्रादेशिक अध्यक्ष श्री. कुवरलाल तिलगामे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

         श्री. मालाधरे यांनी बैठकीला संबोधित केले आणि असोसिएशनच्या दीर्घकालीन ध्येयांवर प्रकाश टाकला. त्यांनी येत्या काळात असोसिएशनच्या वाढीसाठीच्या धोरणांवरही चर्चा केली. सभेला रोहिदास राऊत व कुवारलाल तिलगमें यांनीही मार्गदर्शन केले.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय सचिव दीपक मांडवे यांनी केली.धनराज मोहुर्ले यांनी कार्यक्रमाचे संचालन केले आणि आभार प्रदर्शन अरुण इंगोले यांनी केले. 

           नंतर नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्वसाधारण सभेत विकास पाटील, सेवक पेटकर, विष्णुदास कुमरे, कुलानंद साखरे, सचिन बंडवाल, नारायण उके, सुरजित काळीये, अनुप भागवत, तुषार नंदनवार, अरुण कोल्हे, सिद्धार्थ शंभरकर, जगदीश कराडे आदी उपस्थित होते.