Home Maharashtra 1 मे महाराष्ट्र व कामगार दिनी राज्यभरातील बँक मित्र व बँक सखी…...

1 मे महाराष्ट्र व कामगार दिनी राज्यभरातील बँक मित्र व बँक सखी… — जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार…

ऋग्वेद येवले

   उपसंपादक

दखल न्यूज भारत 

 भंडारा :- १ मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन. या दिवशी राज्यभरातील बँक मित्र आणि बँक सखी सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी आपल्या मागण्यांकडे जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी धरणे धरत आहेत. महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज असोसिएशन तर्फे करण्यात आलेल्या आवाहनानुसार या धरणे कार्यक्रमाचे आयोजन राज्यात सर्वत्र करण्यात येत आहे.

         महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बँक मित्रांची संख्या वीस हजारावर आहे.ज्यांना आज कुठल्याही सेवाशर्ती नाहीत.बँका कॉर्पोरेट कंत्राटदार नेमतात ते नंतर व्यक्तींना कंत्राटी पद्धतीवर अत्यल्प कमिशन देऊन त्यांच्याकडून नवीन खाती उघडणे, डिपॉझिट स्वीकारणे, पेमेंट देणे, विविध सरकारी योजनांची अंमलबजावणी ही आणि यासारखी बँकिंग सेवेशी संबंधित अनेक महत्वाची कामे त्यांच्याकडून अत्यल्प मेहनतान्यावर करून घेतली जातात.

        या बँक मित्रांना निश्चित अशा सेवाशर्ती लागू करण्यात याव्यात, मध्यस्थ कंपनीला दूर सारावे, योग्य दराने कमिशन देण्यात यावे, सेवा देण्यासाठी करण्यात येणारा खर्च बँकेकडून देण्यात यावा या आणि अशा इतर अनेक मागण्यांचा आग्रह धरण्यासाठी हा धरणे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

        या धरणे कार्यक्रमास उपस्थित राहून बँक मित्रांच्या मागण्यांना पाठिंबा द्यावा यासाठी विविध राजकीय पक्ष तसेच संघटनांच्या प्रतिनिधींना धरणे कार्यक्रमास आमंत्रित करण्यात आले आहे. 

        भंडारा जिल्ह्यासाठी हा धरणे कार्यक्रम दिनांक १ मे रोजी त्रिमूर्ती चौक, भंडारा येथे सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत आयोजित करण्यात आला आहे तरी जास्तीजास्त बँक मित्रांनी या धरणे कार्यक्रमात सहभागी व्हावे असे महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशन च्या वतीने जिल्हा निमंत्रक व सहनिमंत्रक यांनी आवाहन केले आहे.