आपल्या देशात हजारो जाती,अनेक धर्म आणि काही वर्ग आहेत.म्हणून या देशातील राजकारण हे एकतर जातीवर चालते,किंवा धर्मावर चालते,पण वर्गानुसार होत नाही.
मताचे राजकारण म्हणजेच राजकारण म्हणण्याची प्रथा आपल्या देशात आहे,पण मतदान ऐवजी मताचे म्हणजे विचाराचे पण राजकारण असते,हे येथील सामान्य कार्यकर्ते आणि जनतेस 77 वर्ष झाली,मतदान करीत आहोत,तरी मतदान आणि मत (विचार ) यातील फरक कळला नाही.म्हणूनच गरीब हा गरीबच,मध्यम हा मध्यम हा मध्यमच आणि श्रीमंत हा श्रीमंतच आहे.
भारताचे राजकारण तत्त्वाचे आहे की व्यावहारिक संधीसाधू भरकटलेले दिशाहीन आहे? याचा पण कुणी विचार करीत नाही.मतदाराला कोणतेही तत्व किंवा तत्वद्न्यान नाही,मात्र ते पक्ष प्रमुखाला असू शकते,असते,पण तडजोड म्हणून तो पक्षप्रमुख त्या तत्वास म्हणजे पक्षाच्या तत्वद्न्यानास बगल देतो,असे पण इथे घडताना दिसते,म्हणूनच कोणतेही तत्व किंवा तत्वद्न्यान या भारतभूमीत रुजताना दिसत नाही.कारण पक्षांचा आणि पक्षप्रमुखांचा धरसोडपणा हे यास कारण आहे,म्हणून आपल्या देशाचे तत्वद्न्यान नेमके कोणते? डावे की उजवे? भांडवलशाहीचे की सरंजामशाहीचे? समाजवादी की साम्यवादी? हे कळेलच नाही.कारण इथे सत्तेवर कधी उजवे केंव्हातरी डावे ( इतरांच्या मदतीने ) असतात. म्हणून सत्तेचे तत्वद्न्यान कोणते? या संभ्रमात जनता अडकून आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हापरिषद या निवडणुका जातीवर चालतात,प्रांतांच्या निवडणुका जात आणि धर्म यांच्या मिश्रणातून होतात,आणि देशाच्या म्हणजे केंद्राच्या म्हणजेच लोकसभेच्या निवडणुका या प्रवर्गावर किंवा चक्क धर्मावर चालतात.पण वर्गावर म्हणजे वर्गीय राजकारणावर इथे निवडणुका होतच नाहीत.
जातीचे आणि धर्माचे संघटन करून किंवा मतदान करून येतील महागाई,भ्रष्टाचार,जातीयता,धर्मांधता,विषमता,बेकारी, अन्याय, अत्याचार,काळाबाजार,शोषण,पिळवणूक बंद होणार नाही,हे सर्वच पक्षांना माहीत आहे,मतदारास पण आता समजायला लागले आहे,तरी मतदार हा भांडवलशाही,घराणेशाही विरुद्ध लोकशाही असे चित्र निर्माण करताना दिसत नाही.वर्गीय लोकशाही,समाजवादी लोकशाही,साम्यवादी लोकशाही म्हणजे काय ? ही तर फार दूरची गोष्ट आहे,पण केवळ गरीब आणि मध्यमवर्गीय म्हणजे शेतकरी शेतमजूर,कारखान्यातील आणि कंपन्यांतील कामगार,खाजगी आणि सरकारी कर्मचारी हे सारे सतत जीवन जगण्याचा संघर्ष करीत असतात,पिढ्यानपिढ्या हा जीवनसंघर्ष आणि त्याचा त्रास या वर्गास माहीत आहे तरी हे संघटित होऊन वर्गीय राजकारण,वर्गीय लोकशाही,वर्गीय मतदान न करता जातीवर आणि धर्मावरच जातात,म्हणूनच परिवर्तन होताना दिसत नाही,क्रांत्या घडताना दिसत नाहीत,म्हणूनच सत्तेत उजवेच कायम ठाण मांडून आहेत.म्हणूनच शोषण ,काळाबाजार,भ्रष्टाचार,पिळवणूक,महागाई,बेकारी ,जातीभेद,धर्मांधता,अंधश्रधा,निकृष्ट अन्न,शिक्षण,आरोग्य या सामंस्याच्या जाळ्यात बहुजन समाज अडकून बसला आहे.
यावर उपाय हाच की,निवडणुका मतदान हे जाती धर्मावर न होता वर्गीय झाले पाहिजे.



