या आधीच्या लेखात ” ज्या देशात अनेक धर्माचे आणि पंथाचे लोक वास्तव्यास असतात , अशा त्या बहुविध धर्माच्या देशाची किंवा राष्ट्राची संस्कृती कोणती? ” या विषयावर विवेचन केले.
या लेखात राष्ट्राची संस्कृती आणि धर्माची संस्कृती म्हणजे काय? यावर चिंतन मांडण्याचा हा प्रयत्न आहे,तो पुढील प्रमाणे___
सावरकर चे म्हणजे हिंदुमहासभेचे आणि गोळवलकरचे म्हणजे आर एस एस या संघटनेचे विचारानुसार आजच्या असो की पूर्वीच्या असो,भारताची मूळ संस्कृती ही हिंदुसंकृती होय.असे म्हणताना हिंदू धर्माची ती संस्कृती नसून भारताची संस्कृती आहे,असे ते म्हणतात,असे म्हणताना हिंदुधर्माचे लोक हेच मूळचे आहेत,म्हणून तेच भारतीय आहेत,आणि बाकीच्या धर्माचे म्हणजे ख्रिश्चन मुस्लिम पारशी यहूदी हे बाहेरील देशाचे आणि त्या त्या धर्माचे असून त्यांची म्हणजे परकियां ची संस्कृती ही भारतीय संस्कृती म्हणजे राष्ट्रीय संस्कृती होऊच शकत नाही,असे त्यांचे म्हणणे आणि अट्टाहास आहे,याचा अर्थ भारतातील मूळचे हे हिंदूच आहेत,आणि बाकी धर्माचे हे परकीयच आहेत,म्हणून हा भारत नव्हे तर हा हिंदुस्थान आहे,असेपण त्यांचे म्हणणे आहे.सिंधू नदीच्या पलीकडील किंवा सिंधू नदीच्या खोऱ्यात म्हणजे परिसरात राहणाऱ्या लोकांना पारशी लोक जेंव्हा इथे आले,तेंव्हा त्यांच्या डिक्शनरीत ‘ स ‘ हा शब्दच नसल्यामुळे त्यांना स या शब्दाचा उच्चार करता येत नव्हता म्हणून सिंधुनदीला ते हिंदू नदी म्हणू लागले,ते याचा अर्थ स ला ‘ ल ‘ म्हणू लागले,म्हणून सिंधू खोऱ्यात राहणारे ते हिंदू झाले.तेंव्हा पासून हिंदू शब्द रूढ झाला,आणि सिंधू संस्कृती म्हणूनच इतिहास संशोधन झाले.
याचा अर्थ सिंधुलोक म्हणजे हिंदुलोक आणि त्यांची संस्कृती हीच भारतीय संस्कृती होय,पर्शिया या देशातून पारशी आले,त्यांच्या धर्माची संस्कृती इथे रुजू लागली,कारण त्यांनी मूळ भारतीयांवर आक्रमण करून त्यांचा प्रदेश जिंकून घेतला,उत्तर ध्रुवावरून आर्यांच्या टोळ्या आल्या,भारतीयांशी युद्ध होऊन ते जिंकले आणि इथे राहायला लागले,त्यांचा आर्य धर्म आणि त्यांची संस्कृती चे आक्रमण पण सिंधू संस्कृतीवर झाले.
आर्यांनी एकसंघ भारतीय समाजाचे चार तुकडे केले,ते म्हणजे ब्राम्हण क्षत्रिय वैश्य शूद्र.अर्थात हे चार वर्ण ही त्यांची संस्कृतीच होय.ती भारतीयांवर लादली.पुढे बौद्ध संस्कृती नष्ट करून आर्य ब्राम्हणांनी म्हणजे वैदिक ब्राम्हणांनी ह्या चार वर्णास बंदिस्त केले,हे मनुस्मृतीचे केले,त्या सोबतच प्रत्येक वर्णात अनेक जाती त्याही रोटी आणि बेटी व्यवहारास बंदी घालून साडेसहाहजार जातींची उतरंड रचना म्हणजे जातीव्यवस्था निर्माण केली,या वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्थेसच त्यांनी हिंदुधर्म असे नामकरण केले.
सावरकर जातीव्यवस्था मानत नाहीत,धर्म म्हणून हिंदूकडे पाहत नाहीत,पण हिंदुसंकृती म्हणून,आणि मूळची ही भारतीय म्हणून पाहतात,तरी पण हा भारत नसून हिंदुस्थानच आहे,असे ते म्हणतात.आर एस एस चे गोळवलकर गुरुजी मात्र हिंदू माणसाकडे मूळचा आणि हिंदुधर्माचा म्हणून पाहतात.हिंदुधर्म म्हणजे वर्णाश्रम आणि जातिव्यवस्थेचा धर्म होय,असे त्यांचे म्हणणे आहे,म्हणून भारताची मूळ संस्कृती ही हिंदुसंकृती होय.तिचाच स्वीकार इतर धर्मियांनी करावा,अन्यथा परकीय म्हणून दुय्यम स्थानावर नागरिक म्हणून राहावे,गुलामसारखे,अन्यथा देश सोडून जेथून आलात तेथे जावे.अशी भूमिका आर एस एस ची आहे.
राष्ट्रीय स्वातंत्र्यातील लढ्याचे नेतृत्व करणारी काँग्रेस संघटना आणि त्यांचे सहयोगी कम्युनिस्ट आणि समाजवादी पक्षांचे आणि विचारांच्या लोकांचे मत या दोघांच्या पेक्षा भिन्न आहे.त्यांच्या मते “या देशावर पर्शियन आर्य मुस्लिम ख्रिश्चन यांचे राज्य होते,सारे देशवाशी त्यांचे हजारो वर्षापासून गुलाम होते, भरत राजा वरून या देशाचे नाव भारत पडले आहे,तेच या देशाचे नाव असले पाहिजे.हा देश आता फक्त हिंदूंचा नाही,तर सर्वच धर्मीयांचा आहे,कारण इंग्रजांकडून सर्वच धर्मियांनी मिळून बलिदान करून हा देश लढाई करून जिंकून घेतला आहे,केवळ हिंदुनीच जिंकला नाही.
म्हणून सर्वधर्मीयांचा हा भारत देश आहे.यावर कुण्या एका धर्माची मक्तेदारी होता कामा नये.यास भारतीय राष्ट्रीय विचार म्हणतात.आता मूळचे कोण? मूळ संस्कृती कोणती? असे मागे जाऊन विचार करणे म्हणजे पुढे जाणे नव्हे तर मागेच जाणे होय.अशा विचाराचा बहुजनांचा विचार आहे,ज्या विचाराचे नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराज,शाहू फुले आंबेडकर,कम्युनिस्ट आणि समाजवादी करीत असतात,जे सावरकर आणि गोळवलकरच्या अगदी विरोधी आहेत,प्रागतिक पुरोगामी परिवर्तनवादी आणि क्रांतिकारी विचार आहेत,देशाला पुढे नेणारे,समतावादी,समाजवादी,धर्मनिरपेक्ष,सर्वधर्म समभाव मानणारे,आणि सर्वसमावेशक अशी भारतीय राज्यघटना म्हणजेच संविधान मानणारे,संविधान वर निष्ठा असणारे हे विचार आणि हा बहुजन समाज आहे.हा विचार म्हणजेच राष्ट्रवाद होय,मानवतावाद होय.
धर्मवाद किंवा धर्मसंकृती म्हणजे केवळ माणसाला केंद्रबिंदू मानून त्याच्या कल्याणाचा विचार न करता ईश्वराला केंद्रबिंदू मानून त्याची आराधना म्हणजेच मोक्ष.मोक्ष म्हणजेच माणसाचे कल्याण ,असा विचार आणि तदनुसार कार्य कृती कर्मकांड अंधश्रधा म्हणजेच धर्मनिष्ठा होय.
राष्ट्र संस्कृती म्हणायचे तर केवळ एका समूहाची जातीची धर्माची संस्कृती होऊ शकत नाही,तर साऱ्यांचीच संस्कृती म्हणजेच “सर्व धर्म समभाव व धर्मनिरपेक्षता आणि सत्तेला शासनाला प्रशासनाला जात धर्म नसतो तर त्यांना केवळ राज्य घटनाच त्यांचा आचरण धर्म किंवा संस्कृती असते.यासच राष्ट्रधर्म म्हणतात.
सारांश जातीभेद धर्मभेद संस्कृतीभेद न करता प्रत्येक भारतीयांचा स्वातंत्र्याचा हक्क,विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ,आराधनेचा हक्क अबाधित राहणे किंवा ठेवणे,म्हणजेच राजकीय आर्थिक सामाजिक न्याय होय.


