प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
चिमूर तालुकातंर्गत तथा मौजा पिंपळगाव नदीपात्रातील अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या चोर माफीयांवर उचित फौजदारी तथा दंडात्मक कारवाई त्वरित करण्याऐवजी,”त्यांना सर्रासपणे चिमूर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांद्वारे आणि पोलिस विभाच्या अधिकाऱ्यांद्वारे अभय मिळत असल्याचे मौजा पिंपळगाव नदीपात्रातील वाळू उपसा प्रकरणावरुन स्पष्ट दिसून आले आहे.
दिनांक २१ एप्रिल २०२५ च्या रात्रोला दोन हायवा व हायवा मध्ये वाळू भरणारे एक पोकलॅंड मौजा पिंपळगाव वासियांनी पकडून पत्रकारांना कायदेशीर मदतीसाठी घटनास्थळावर बोलाविले.
काही पत्रकार घटना स्थळावर गेले आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना घटनाक्रमाची सत्य माहिती पत्रकार विलास मोहिनकर यांनी दिली.
परंतु पाहिजे त्या प्रमाणात चंद्रपूर जिल्हातंर्गत अधिकाऱ्यांकडून कायदेशीर बाबींचे आणि उत्तम कर्तव्याचे सहकार्य मिळाले नाही,हे वाळू घाटावर उपस्थित मौजा पिंपळगाव येथील नागरिक बघत होते..
मौजा पिंपळगाव येथील अवैध वाळू उपसा घटनास्थळावर गेलेल्या पत्रकारांनी,श्री.स्वप्नील यावले यांच्यासोबत कुठल्याही प्रकारचा संपर्क केला नाही आणि त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली नाही किंवा त्यांना अजिबात ओळखत नाही.
असे असताना त्याच व्यक्तींने चिमूर तालुक्यातील इमानदार पत्रकारांवर असत्यावर आधारित खोटे आरोप करावे व भिसी पोलिस स्टेशनला खोटी तक्रार दाखल करावी हे एक बेकायदेशीर कर्तव्यातले आश्चर्यच म्हणावे लागेल.
तद्वतच भिसी पोलिसांनी मौजा पिंपळगाव नदीपात्रात अवैध वाळू उपसा प्रसंगी उपस्थित असलेल्या नागरिकांचे बयान न घेता व हायवा मध्ये वाळू भरणारे पोकलॅंड भिसी पोलिस स्टेशनला जमा न करता,भिसी पोलिस श्री.स्वप्निल यावलेला अतिमहत्त्व कसे काय देतात?हेच गुलदस्त्यातील कोडे आहे.
श्री.स्वप्निल यावले यांनी दोन पत्रकारांविरोधात तक्रार दिली. त्यापैकी एक पत्रकार नागपूरला असल्याने ते घटनास्थळावर रोत्रोच्या वेळी अजिबात नव्हते.आणि त्यानंतर सुध्दा ते चिमूर परिसरात नाही.
यामुळे श्री.स्वप्निल यावले यांनी भिसी पोलिस स्टेशनला दिलेल्या खोट्या तक्रारीची व त्यांच्या सर्व मानसिकतेची सर्व यंत्रातंर्गत आणि सर्व यंत्रणे अंतर्गत कसून तथा सखोल चौकशी होणे अती आवश्यक झाले आहे.
म्हणूनच पत्रकार विलास मोहिनकर यांनी आज ईमेल द्वारे आणि प्रत्यक्ष…
१) मा.विनय गौडा साहेब,
जिल्हाधिकारी चंद्रपूर….
२) मा.सुदर्शन मुक्कमा साहेब,
जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रपूर..
३) मा.किशोर घाडगे साहेब,
उपविभागिय अधिकारी चिमूर….
४) मा.राकेश जाधव साहेब,
उपविभागिय पोलिस अधिकारी चिमूर…
५) मा.श्रिधर राजमाने साहेब,
तहसीलदार चिमूर…
६) मा.जितेंद्र चांदे साहेब..
ठाणेदार भिसी..
यांचेकडे तक्रारी केल्या आहेत.
त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे की,भारतीय संविधान मुलभूत आर्टिकल ५१ (क) नुसार वाळू सारख्या खनिज संपदेचे आणि इतर राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करण्याची शासन-प्रशासनासह प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे.
तद्वतच भिसी पोलिस स्टेशन मध्ये श्रि.स्वप्निल यावले या अनोळखी व्यक्तींनी अर्जदारांवर खोटे आरोप लावून खोटी तक्रार भिसी पोलिस स्टेशनला दिली असल्याने त्यांची सर्व प्रकारची कायदेशीर शक्तीनिशी चौकशी करावी व त्यांच्यावर अर्जदारांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली या अनुषंगाने उचित फौजदारी कारवाई करावी अशी मागणी केली आहे...
याचबरोबर दखल न्यूज भारत वेब पोर्टलचे मुख्य संपादक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे माजी विदर्भ उपाध्यक्ष,नरवडे जागतिक ग्लोबल हुमन राईट्सचे माजी महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष श्री.प्रदीप रामटेके साहेब हे मौजा पिंपळगाव नदी पात्रातील वाळू उत्खनन मोका स्थळावर आले नसताना आणि ते मोका स्थळावरील कुठल्याही व्यक्तींना ओळखत नसताना त्यांचे नाव सुध्दा अज्ञात आरोपी म्हणून टाकल्या गेले असल्याची माहिती मिळाली असल्याने तक्रारदार किती खोटारडा आहे हे लक्षात आल्यावाचून राहत नाही..
तक्रारदार विलास मोहिनकर यांनी अर्जामध्ये सत्य माहिती दिली असून ,दिनांक २१ एप्रिल २०२५ रोज सोमवारच्या रात्रोला चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा पिंपळगाव नदीपात्रातील वाळू पोकलॅंडच्या माध्यमातून २ हायवा मध्ये भरली असून,संबधित अधिकाऱ्यांना फोन करूनही ते मौका स्थळावर आले नसल्याची माहिती मला भ्रमणध्वनी द्वारे देण्यात आली.
सदर व्यक्तीच्या माहितीच्या आधारे मी पत्रकार या कर्तव्य संकल्पनेला अनुसरून एका सोबत्याला घेऊन मौजा पिंपळगाव येथील नदीपात्रातील वाळू उपसा स्थळावर पोहचलोय आणि घटनेची वास्तव माहिती उपस्थित अनेक युवकांकडून घेतली.
माहिती घेतल्यानंतर मी स्वतः माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार,चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा साहेब,चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुक्कमा साहेब,चिमूर उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे साहेब,चिमूर उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव साहेब,चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने साहेब,भिसी ठाणेदार जितेंद्र चांदे साहेब यांना फोन करून अवैध वाळू उत्खननाची आणि पोकलॅंड व दोन हायवाची माहिती दिली.
माहिती दिल्यानंतर काही वेळानंतर त्याच आदरणीय जबाबदार अधिकाऱ्यांसोबत परत एकदा बोलण्याचा प्रयत्न केला असता बऱ्याच अधिकाऱ्यांनी फोन बंद केले असल्याचा अनुभव आला.
परंतु चिमूर उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे साहेब आणि चिमूर उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव साहेब यांनी भिसी पोलिस स्टेशनला संपर्क करुन कारवाई करण्यास सांगतो असे म्हणाले.
काही वेळा नंतर रात्रोलाच भिसी पोलिस स्टेशनचे बिट जमादार विजय बगडे हे भिसी पोलिस स्टेशनचे गाडीचालक शिपायांसोबत आले आणि वाळू भरलेले दोन हायवा पोलिस स्टेशन भिसी येथे जमा केले.
मात्र,दोन हायवा मध्ये ज्या पोकलॅंड द्वारे वाळू भरण्यात आली ते पोकलॅंड जमा केले नाही.अजूनही सदर पोकलॅंड जमा केले नाही अशी माहिती आहे.
सदर पोकलॅंड चे मालक कोण आहेत आणि कुठले आहेत याची मला मुळात कल्पना नाही.जर सदर पोकलॅंड भिसी पोलिस स्टेशनला वेळीच जमा करण्यात आले असते तर पोकलॅंड मालकाचे संपूर्ण नाव आणि त्यांचा इत्यंभूत पत्ता माहीती झाले असते.
मौजा पिंपळगाव नदीपात्रात मौजा पिंपळगाव येथील अनेक नागरिक उपस्थित होते.त्यांच्या देखतच दोन हायवा मध्ये रात्रोच्या वेळी दिनांक २१ एप्रिल २०२५,रोज सोमवारला वाळू भरली असे त्यांचे म्हणणे होते.
पत्रकार म्हणून मी आणि इतर पत्रकार बातमी वृत्त संकलनाचे कामासाठी प्रत्यक्ष स्थळावर जातोय आणि सत्यावर आधारित बातमी संकलनाचे काम करतोय.सत्यावर आधारित वृत्त संकलनाचे आमचे कर्तव्य शासन-प्रशासनाला मदत करणारे आहे.तद्वतच राष्ट्रिय मालमत्तेचे संरक्षण करणारे आणि जतन करणारे आहे.
*****
तक्रार अर्जातील अति महत्वाचे मुद्दे…
मुलभूत कर्तव्ये अंतर्गत भारतीय संविधानाच्या आर्टिकल ५१ (क),(छ) नुसार वने,सरोवरे,नद्या,व वन्य जिवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करुन त्यात सुधारणा करणे आणि प्राणी मात्रांबदल दया-बुध्दी बाळगणे,या संबंधाने देशातील सर्व नागरिकांना अधिकार मिळाला आहे.
तद्वतच आर्टिकल ५१ (क),(झ) नुसार सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करण्याचा आणि हिंसाचाराचा निग्रहपुर्वक त्याग करण्याचा अधिकार सुध्दा भारतातील सर्व नागरिकांना मिळाला आहे.
या अधिकारानुसार कर्तव्यदक्ष भारतीय नागरिक म्हणून नद्यांचे व नदीपात्रातील वाळू खनिज संपदेचे संरक्षण करण्याचा अधिकार अर्जदारास आहे.
******
तक्रार अर्जातील महत्वाचा मुद्दा…
श्री.स्वप्निल यावले या इसमांसी माझी (अर्जदांची) आणि आमचे वरिष्ठ पदाधिकारी प्रदीप रामटेके साहेबांची अजिबात ओळख नाही.
याचबरोबर श्री.स्वप्निल यावले हे माझ्यासाठी आणि प्रदीप रामटेके साहेबांसाठी अनोळखी असल्याने त्यांच्या सोबत मोबाईलवर चर्चा करणेबाबतचा सुताराम संबंध नाही.
असे असताना श्री.स्वप्निल यावले यांनी पोकलॅंड वर किंवा वाळू भरलेल्या हायवावर उचित कारवाई स्थानिक अधिकाऱ्यांकडून होवू नये म्हणून चिमूर तालुक्यातील काही अधिकाऱ्यांच्या आणि काही भाजपा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अर्जदाराच्या आणि प्रदीप रामटेके साहेबांच्या विरोधात जाणिवपूर्वक खोटी तक्रार दाखल केली असल्याचे खात्रीपूर्वक तक्रदारांचे म्हणणे आहे.
यामुळे अर्जदारांच्या विरोधात चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा भिसी पोलिस स्टेशनला खोटी तक्रार दाखल करणाऱ्या करणाऱ्या श्री.स्वप्निल यावले यांच्यावर फौजदारी आणि इतर स्वरूपाची कायदेशीर कारवाई वेळ न दवडता होणे गरजेचे आहे.
असे तक्रारदार तथा पत्रकार विलास मोहिनकर यांचे म्हणणे आहे.
तद्वतच पत्रकार विलास मोहिनकर यांनी अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की,स्वतःला सर्व कायदेशीर कारवाईतून वाचवण्यासाठी श्री.स्वप्निल यावले यांनी अर्जदाराविरुद्ध दिनांक २२ एप्रिल २०२५ रोज मंगळवारला खोटी तक्रार भिसी पोलिस स्टेशनला दाखल करुन शासन-प्रशासनाची दिशाभूल केली आहे.
याचबरोबर त्यांनी अर्जदारांना खोट्या तक्रारीला अनुसरून फसविण्याचा प्रयत्न केला आहे.हा एक गंभीर गुन्हा आहे.
यामुळे गैरअर्जदार श्री.स्वप्निल यावले यांच्यावर विविध कलमान्वये फौजदारी कारवाई वेळत करावी अशी विनंती पुर्वक प्रार्थना सर्व अधिकाऱ्यांना केली आहे..
विविध मुद्यांवर आधारलेल्या जाटील समस्या अन्वये प्रकरण जनहित याचिका अंतर्गत न्यायप्रविष्ट सुध्दा होण्याची शक्यता आहे.




