Home Maharashtra संतोष बि.थिटे असणार चिमूरचे नवे अप्पर जिल्हाधिकारी..‌

संतोष बि.थिटे असणार चिमूरचे नवे अप्पर जिल्हाधिकारी..‌

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

        चिमूर उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांना चिमूर उपविभागीय कार्यालयात जैसे थे ठेवून चिमूर अप्पर जिल्हाधिकारी म्हणून संतोष बी.थिटे लवकरच रुजू होणार आहेत.

    महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वने विभागाने दिनांक २२ एप्रिल २०२५ ला परिपत्रक काढून श्री.संतोष बी.थिटे यांची चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

          अप्पर जिल्हाधिकारी संतोष बी.थिटे हे नागरिकांच्या मुलभूत अधिकारांसह त्यांच्या महत्त्वपूर्ण कामाकडे (समस्यांकडे) जातीने लक्ष देणार काय?हे त्यांच्या कर्तव्य कार्यकाळात दिसून येईल.

        मात्र,आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या कार्यकाळात चिमूरला येणाऱ्या नवीन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी निष्पक्ष कर्तव्य पार पाडावे अशी अपेक्षा चिमूर,सिंदेवाही,नागभिड,ब्रम्हपुरी तालुक्यातील नागरिकांच्या असणार आहेत.