Home देशविदेश मौजा आंबेनेरी चे मजूर मजूरीच्या रूपयांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात मारताहेत खेटा..‌ —...

मौजा आंबेनेरी चे मजूर मजूरीच्या रूपयांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात मारताहेत खेटा..‌ — मजूरीचे रूपये देण्याची तसदी सरपंच,उपसरपंच,सदस्य आणि ग्रामसेवक केव्हा घेणार?

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

       चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा आंबेनेरी येथील शेकडो मजूरांनी विविध कामातंर्गत मजूरी केली.

       परंतु वेळेत कामाची मजुरी दिली नसल्याने आज मजूरांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या आणि सचिवांच्या दिरंगाई कार्यपद्धती नुसार कामकाजावर संताप व्यक्त करीत चक्क ग्रामपंचायत आवारातील गट्टू काढण्यास सुरुवात केली होती.

                या घटनेमुळे हादरलेले सरपंच अस्वस्थ झाले होते.त्यांनी मजूराविरोधात तक्रार दाखल करण्याचे मन बनविले होते.पण तक्रार दाखल केली तर गावात उद्रेक होऊन शांतता भंग होईल अशी शक्यता असल्याने त्यांनी पोलिस स्टेशन भिसीला तक्रार देणे टाळले.

         पण,गोरगरीब असलेल्या गावातील मजूर महिलांच्या आणि पुरुषांच्या मजूरींचे रुपये वेळेत देण्याकडे लक्ष दिले असते तर मजूरांचा संताप ग्रामपंचायत आवारातील गट्टू काढण्यापर्यंत गेला नसता याकडे सरपंच,उपसरपंच,सदस्य आणि ग्रामसेवक यांनी लक्ष दिले पाहिजे,या मताचे मौजा आंबेनेरी वासिय आहेत.

           मजूरांचा आजचा संताप बघता ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक लवकरात लवकर मजूरांची मजूरी देणेबाबत तसदी घेतील का? तसदी घेतली तर हे त्यांच्या उतम कर्तव्यातील बाब असेल.