प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
काल रात्रोला १० ते ११ वाजताच्या दरम्यान चिमूर शहरातील कांपा मार्गावर अवैधरित्या रेतीने भरलेला ट्रक उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांनी पकडून पोलिस स्टेशन चिमूर येथे जप्त केले आहे.
जप्त केलेल्या ट्रकचा क्रमांक एम.एच.४०,सि.टी.४४४६,आहे.सदर कारवाई उत्तम कर्तव्याचा भाग आहे.
परंतू पोलिस विभाग अवैध वाळू आणि मूरुन चोरीवर नियंत्रण आणण्यासाठी मानसिक दृष्ट्या सज्ज झाले आहे काय?हा प्रश्न जनमानसांच्या मनात भ्रामकता तयार करतो आहे.
चिमूर तालुकातंर्गत अवैध वाळू उत्खनन जोरात सुरू आहे.वाळूचे अवैध उत्खनन करणारे भाजपाचे कार्यकर्ता आणि आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे नातेवाईकच आहेत.यामुळे अवैध वाळू उत्खननाकडे तहसीलदार श्रिधर राजमाने आणि मंडळ अधिकारी, तलाठी,पोलिस विभागाचे अधिकारी जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात हे उघडच आहे.
मात्र,काल २२ एप्रिल २०२५ रोज मंगळवारला चिमूर शहरातील कांपा मार्गावर अवैधरित्या रेतीने भरलेला ट्रक उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी पकडून पोलीस स्टेशनला जप्त केले आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव हे सदर ट्रक मालकांवर व ट्रक चालकांवर काय कारवाई करतात यावर त्यांच्या कर्तव्याचे गांभीर्य अवलंबून आहे.
तद्वतच मोठमोठ्या तस्करांच्या अवैध वाळू आणि मूरुन उत्खननाकडे तहसीलदार श्रिधर राजमाने हे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात.यामुळे ते सत्तेच्या ओझात दबलेले आहेत असा सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांच्यावर नेहमी आरोप होतो आहे.
कालच्या अवैध वाळू उत्खननातंर्गत दोन हायवा आणि एक पोकलॅंड जप्तीला अनुसरून कारवाई करण्यासंबधाने तहसीलदार श्रिधर राजमाने आणि भिसी पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार निशांत फुलेकर यांचे मन कायदेशीर दृष्ट्या योग्य नव्हते आणि त्यांनी आपल्या कर्तव्याला अनुसरून साजेशी कामगिरी केली नाही हे उघड आहे.
याचबरोबर आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या सत्तेचा धाक किंवा दबाव चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने आणि भिसी पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार निशांत फुलेकर यांच्यावर होता असे म्हणावे काय?
कारण दोन्ही हायवा हे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या बापाच्या आणि भावाच्या कंपनीचे असल्याने आणि पोकलॅंड भिसी येथील त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचे असल्याने तहसीलदार श्रिधर राजमाने आणि भिसी पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार निशांत फुलेकर उचित कारवाई करण्याची हिंमत करीत नव्हते.
यामुळे सर्व सामान्य नागरिकांचा विश्वासच चिमूर तालुक्यातील संबंधित अधिकऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर राहिलेला नाही असे चित्र आहे.



