बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
पंढरपूर येथे रविवार दिनांक 20/ 4 /2025 रोजी विश्वकर्मा पांचाळ सुतार सामाजिक संस्था सोलापूर द्वारे आयोजित राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न झाला.
या मेळाव्याचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रशांत परिचारक (मालक) तर अध्यक्ष म्हणून हनुमंतराव पांचाळ (पुणे राज्य प्रदेशाध्यक्ष ) यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम झाला.
उद्घाटन प्रसंगी माजी आमदार प्रशांत (मालक) परिचारक म्हणाले की विश्वकर्मीय समाजाची व्याप्ती खूप मोठी आहे.आशा या विश्वकर्मीय समाजातील सुतार समाज हा आपल्या कुशलतेवर आजच्या युगात टिकून आहे.
सामाजिक बांधिलकी म्हणून या संस्थेने केलेल्या कार्याचे कौतुकच केले पाहिजे.आमदार प्रशांत परिचारक हे सुतार समाज वधू वर पालक परिचय मेळाव्या प्रसंगी बोलत असताना त्यांनी अतिशय महत्त्वाचे वक्तव्य केले.
या कार्यक्रमासाठी हजारो संख्येने उपस्थितीत असलेल्या समाज बांधवांना आमदार प्रशांत परिचारक यांनी शुभेच्छा पण दिल्या.
सुतार समाजातील खेड्यापाड्यातील मुला मुलींची शहरांमध्ये शिक्षणासाठी राहण्याची सोय व्हावी यासाठी वस्तिगृहासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.तसेच मेकॅनिकल चौकास “विश्वकर्मा चौक” असे नामकरण देण्यासाठी आपण पाठ पुरावा करून ते काम मार्गी लावू असे वधु-वर पालक परिचय मेळाव्या प्रसंगी आमदार प्रशांत परिचारक यांनी आश्वासन दिले.
अध्यक्षीय भाषणात हनुमंतराव पांचाळ बोलत असताना म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या ठिकाणी संस्थेचे कार्य चांगले असल्यामुळे तोंड भरून कौतुक केले पाहिजे.सर्व सुतार समाज बांधवांनी एकत्र येऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा आसेही हनुमंत पांचाळ यांनी सुतार समाज बांधवांनाआवाहन केले.
तसेच वस्तिगृहासाठी आम्ही आपल्या संस्थेस सहकार्य करण्याचे आश्वासन दिले .
कार्यक्रमाचा प्रास्ताविक मध्ये संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब सुतार ( सर ) यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून संस्थेने आत्तापर्यंत केलेल्या समाज हिताच्या कार्याचा आढावा सर्वांसमोर मांडला.तसेच वधू वर व त्यांचे पालक यांना आपला योग्य तो जोडीदार निवडण्यासाठी मोठ्या अपेक्षा न ठेवता जोडीदार निवडावा यासाठीच हे व्यासपीठ निर्माण करून दिलेले आहे असे मनोगत संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सुतार (सर) यांनी मेळाव्याप्रसंगी केले.
या कार्यक्रमा प्रसंगी मधुकर सुतार ( सर) यांनी संत बंधू जळोजी -मळोजी महाराज यांच्या विषयी लिहिलेल्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून समाजातील यूपीएससी एमपीएससी व मेडिकल क्षेत्रातील विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंताचा योग्य तो सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आला.
सामाजिक बांधिलकी जोपासताना रक्त दान शिबिराचे व आरोग्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिरात अनेक युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून रक्तदान केले.या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा व जिल्ह्याबाहेरील वधू-वर यांनी मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी केली.
सदर कार्यक्रमाच्या सकाळ सत्रात बनसोडे साहेब व राम सुतार साहेब यांनी पी.एम. विश्वकर्मा योजना व बांधकाम कामगार योजना याविषयी युवकांना सखोल असे मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून चंद्रकांत कांडेकरी (कोल्हापूर), सतीश शिंदे (बुलढाणा ),राजेश भालेकर (जालना), बापूराव भालेकर (बीड ),दिलीप आकोटकर (अमरावती) ,दत्तात्रय खैरनार (नाशिक ),सुरेश राऊत (नगर), हरिश्चंद्र पांचाळ( लातूर), मनीष रुले (अकोला) ,शरद धावड (सोलापूर ),डॉक्टर बसवराज सुतार (पंढरपूर) ,सुभाष मस्के (पंढरपूर ),प्रशांत आप्पा पाटील (बार्शी),शशिकांत सुतार (सांगली,),गणेश सुतार (सांगली), बाळासाहेब सुतार( वडाळा),ॲड.नानासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम व्यवस्थित व यशस्वी पणे पार पाडण्यासाठी चंद्रकांत सुतार,मधुकर आढळकर,नरसिंग सुतार,सतीश सुतार,सचिन सुतार,राजेंद्र सुतार,भरत गवळी,अक्षय सुतार,विजय मोरे,दत्तात्रय पांचाळ,वसंत सुतार,रविराज घोडके,रवींद्र पांचाळ,भारत काळे,धनंजय सुतार,कालिदास आढवळकर,राजेश महामुनी,रमेश सुतार,शिवदास सुतार,अंबादास सुतार, रावसाहेब रोकडे,सखाराम डोरले,नितीन सुतार,सतीश आढवळकर,तुकाराम सुतार,आप्पा सुतार,सुरज डोळस,राजू आढवळकर,आदींनी विशेष परिश्रम घेतले .
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत वाघमारे, आनंद पिंपळे,सौ सुषमा पांचाळ व कु.साक्षी पांचाळ( पुणे) यांनी केले तर आभार प्रदर्शन मधुकर सुतार यांनी मानले.
सर्वच उपस्थित सुतार समाज बांधवांसठी महाभोजन व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती.शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.



