Home Maharashtra वाळू भरलेल्या आमदार बापाच्या आणि भावांच्या कंपनीच्या हायवा वाहणावर कोणती कारवाई होणार?...

वाळू भरलेल्या आमदार बापाच्या आणि भावांच्या कंपनीच्या हायवा वाहणावर कोणती कारवाई होणार? — हायवा आणि पोकलॅंड मालकांवर वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यास भिसी पोलिसांची का म्हणून कुचराई?….

उपक्षम रामटेके/शुभम गजभिये..

       मौजा पिंपळगाव वासियांनी दिनांक २१ एप्रिल २०२५ ला रात्रोच्या वेळेस चिमूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या आमदार बापाच्या आणि भावाच्या कंपनीचे वाळू भरलेले दोन हायवा व वाळू भरण्यासाठी आणलेली भिसीवासीयांची पोकलॅंड पकडले.

      तद्वतच सदर दोन्ही हायवात वाळू भरण्यासाठी भिसी येथील इसमाची पोकलॅंड आणण्यात आली होती.रात्रोच्या वेळी दोन्ही हायवा हे भिसी पोलिस स्टेशनला जमा करण्यात आले तर पोकलॅंड आज जमा करणार आहेत.

           मात्र भिसी पोलिस स्टेशन ला वाळू चोरीचा गुन्हा दाखल न करताच चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांच्या ताब्यात दोन्ही हायवा आणि पोकलॅंड देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

         परंतु सबळ पुरावा असताना वाळू चोरीचा गुन्हा दाखल न करताच चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांच्याकडे दोन्ही हायवा आणि पोकलॅंड वर्ग करण्याची भिसी पोलिसांनी मन का म्हणून बनवले? हे एक कोडेच आहे.

             चंद्रपूर जिल्ह्यातील पोलिसांना वाळू चोरी बाबत गुन्हा दाखल करण्याचा अधिकार असताना,वाळू चोरीचा गुन्हा दाखल न करताच तहसीलदार श्रिधर राजमाने यांच्या ताब्यात दोन्ही हायवा आणि पोकलॅंड देण्याचा नवीनच फंटा पुढे येत आहे.

         चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांच्या ताब्यात वाळू भरलेले दोन्ही हायवा आणि एक पोकलॅंड दिली की फौजदारी कारवाई होण्यापासून वाळू चोरांना मुक्तता मिळते,हे सर्वश्रुत आहे.

              दोन्ही हायवा व एक पोकलॅंड जप्ती अंतर्गत तहसीलदार श्रिधर राजमाने यांच्या ताब्यात दिले की,एका झटक्यात दोन्ही हायवा आणि पोकलॅंड दंडात्मक कारवाई करुन सोडविले जाणार हे ठरलेले आहे.

      मात्र चिमूर तालुक्यातील नागरिकांना वाटते की श्रीमंत भांडवलदार वाळू व मूरुन तस्करीचा व्यवसाय करीत असतील तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई व दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे.

         वाळू चोरी प्रकरणातंर्गत तहसीलदार श्रिधर राजमाने आणि भिसी पोलिस काय भूमिका घेतात आणि काय करतात?हे कळणारच आहे.