प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
एमकेएस कंपनीचे वाळू भरलेले दोन हायवा व एक पोकलॅंड मौजा पिंपळगाव वाशियांनी रात्रोला पकडले आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना संपर्क करुन माहिती दिली.
मात्र,शासन-प्रशासनाला मदत करणाऱ्या मौजा पिंपळगाव वाशियांच्या उत्तम आणि कौतुकास्पद कामगिरीला महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अजिबात महत्व दिले नाही.लायक नसलेल्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी मौजा पिंपळगाव वासियांना झुलवत ठेवले असल्याचा धक्कादायक आणि तितकाच गंभीर प्रकार दिनांक २१ एप्रिल २०२५ च्या रात्रोला घडलाय.
परंतू हार न मानता मौजा पिंपळगाव वासियांनी पत्रकार केवलसिंग जुनी,पत्रकार विलास मोहिनकर यांच्या सोबत संपर्क करुन घडलेला सर्व प्रकार सांगितला व सहकार्य करण्याची विनंती केली.
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा पिंपळगाव वासियांच्या उत्तम आणि कौतुकास्पद कामगिरीला पत्रकार केवलसिंग जुनी,पत्रकार विलास मोहिनकर यांनी गांभीर्याने महत्व दिले आणि मोका स्थळावर गेले.
मोका स्थळावरुन माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार,चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा,चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुक्कमा,उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे,उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव,तहसीलदार श्रिधर राजमाने,भिसी पोलिस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र चांदे,तलाठी जांभुळघाट यांच्या सोबत संपर्क केला व एमकेएस कंपनीचे वाळू भरलेले दोन हायवा व एक पोकलॅंड मौजा पिंपळगाव वासियांनी,मौजा कोटगाव ते मौजा पिंपळगावच्या मधात असलेल्या नदीपात्रात पकडले असल्याची माहिती दिली.
सर्व महसूल अधिकाऱ्यांच्या संपर्कानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी आपले मोबाईल बंद केले आणि आपल्या उत्तम व योग्य कर्तव्याला त्यांनी नाकारले असल्याचा थरार मौजा पिंपळगाव वासियांनी आणि उपस्थित दोन्ही पत्रकारांनी प्रत्यक्ष अनुभवला.
याचबरोबर चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुक्कमा यांनी सुध्दा मौजा पिंपळगाव वासियांना कायदेशीर सहकार्य रात्रोच्या वेळी केले नसल्याचे दिसून आले.
मात्र,मौजा पिंपळगाव वासियांनी आणि पत्रकारांनी वाळू भरलेले दोन हायवा व पोकलॅंड जप्त केल्याशिवाय हलायचे नाही असा पक्का पावित्रा घेतला व तसाच निश्चय सुध्दा केलाय.
शेवटी भिसी पोलिस स्टेशनचे जांभुळघाट बिट जमादार श्री.बगडे आणि एक पोलिस चालक असे दोघे घटनास्थळावर आले.घटनास्थळावर वाळू भरलेल्या हावाचा व पोकलॅंडचा पंचासमक्ष पंचनामा केलाय आणि रात्रोलाच वाळू भरलेले हायवा भिसी पोलिस स्टेशनला जमा करण्यात आले तर पोकलॅंड आज जमा करणार आहेत.
एमकेएस कंपनी ही उधोगपती तथा माजी आमदार मितेश भांगडिया,आमदार किर्ती कुमार भांगडिया यांचे लहान बंधू ,श्रिकांत भांगडिया यांची आहे.
जर त्यांच्या नावाने एमकेएस कंपनी रजिस्टर असेल तर ते सुद्धा वाळू चोरीचा आणि मुरुम चोरीचा अवैध व्यवसाय करतात आणि त्यांच्या अवैध व्यवसायाला चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा,चिमूर उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे,चिमूर उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव,चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने,चिमूर ठाणेदार संतोष बक्काल,भिसी ठाणेदार जितेंद्र चांदे,चिमूर तहसिलचे सर्व नायब तहसीलदार,चिमूर तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी,सर्व तलाठी (पटवारी/ग्राम महसुल अधिकारी) हे डोळे झाकून सहकार्य करतात असेच म्हणावे लागेल?,असाच रात्रोचा भयंकर थरार सत्य स्थिती कथन करतो आहे?.
मौजा पिंपळगाव वासियांनी एमकेएस कंपनीचे वाळू भरलेले दोन हायवा व एक पोकलॅंड रात्रोला पकडल्यानंतर एकही जबाबदार अधिकारी मोका स्थळावर आले नसल्याने त्यांच्या कर्तव्यावर व भुमिकांवर शंका घेण आणि येणे सहाजिकच आहे.
तद्वतच सदर संबंधित अधिकारी आणि कर्मचारी भित्रे,कर्तव्यहिन,गैरविश्वासू,कामचुकार,असल्याचे रात्रोच्या घटनाक्रमावरुन दिसून आले.
यामुळे अशा कामचुकार,भित्र्या,गैरविश्वासू,कर्तव्यहिन प्रशासकीय लोकसेवकांची(अधिकारी व कर्मचाऱ्यांची) नागरिकांना अजिबात गरज नाही.त्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने सेवेतून बडतर्फ केले पाहिजे या मताची जनता आहे.
परत्वे शासकीय उपक्रमांतर्गत गाव खेड्यातील नागरिकांना ठोक मनाने मार्गदर्शन करणे वाले अधिकारी आणि कर्मचारी महत्त्वपूर्ण प्रसंगाच्या वेळी गावखेळड्यातील नागरिकांना सहकार्य करीत नाही,हि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दुटप्पी भूमिका अन्याय करणारीच आहे,हेच रात्रोच्या प्रसंगावरुन लक्षात आले आहे.
एमकेएस कंपनी ही माजी आमदार मितेश भांगडिया,आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे लहान बंधू श्रिकांत भांगडिया यांची आहे.म्हणूनच आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या धाकामुळे वाळू आणि मूरुन चोरीचा व्यवसाय चिमूर तालुक्यात जोरदारपणे सुरू आहे…
मात्र,मौजा पिंपळगाव वासियांच्या आणि त्या दोन पत्रकारांच्या आत्मविश्वासाला,हिम्मतीला दाद देत सलामच!



