Home देशविदेश शासकीय कार्यालयाची तोडफोड करा,शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करा,आता गुन्हेगार आरोपींना अटक होणार नाही,चिमूर...

शासकीय कार्यालयाची तोडफोड करा,शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करा,आता गुन्हेगार आरोपींना अटक होणार नाही,चिमूर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची संसयास्पद भुमिका..‌‌ — राजकीय हस्तक्षेपामुळे चिमूर उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांचा नवीनच फंटा… — भाजपा समर्थित कार्यकर्त्यांना अटक नाही,मग त्या दोघांना अटक का म्हणून केली? 

प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक 

         अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातंर्गत १४ एप्रिल ला रात्रोच्या वेळी पोलिस स्टेशन मध्ये संतप्त जमावाने दगडफेक केली.या दगडफेकीत चिमूर पोलिस स्टेशन इमारतीच्या काचा संतप्त जमावाकडून फोडल्या गेल्यात आणि एका महिला पोलिस शिपाई यांना दगडफेक अंतर्गत दुखापत झाली.

             संतप्त जमावाकडून झालेल्या दगडफेकी अंतर्गत नुकसान प्रकरणाचे पडसाद अख्या चंद्रपूर जिल्ह्यात पडले होते.यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी तात्काळ चोख बंदोबस्त पोलिस विभागाकडून चिमूर शहरात ठेवण्यात आला आणि अजूनही आहे.

          दगडफेकीच्या गंभीर प्रकरणानंतर संबंधित आरोपींवर १३ विविध भांदवी कलमान्वंये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.यात २ प्रकारचे भांदवी कलम जन्मठेपेच्या शिक्षेशी संबंधित आहेत.तर १ प्रकारचे भांदवी कलम १० वर्षांपर्यंतच्या शिक्षेशी संबंधित आहे.

         भांदवी कलम १९५ (१) आणि (२) हे खोट्या पुराव्यानिशी संबंधित आहे.या भांदवी कलमातंर्गत ७ वर्षाच्या वरच्या शिक्षेचे किंवा मृत्यूदंडाच्या शिक्षेचे प्रावधान आहे.

           याचबरोबर भांदवी कलम १३२ हे सार्वजनिक सेवकाला त्याचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी प्राणघातक हल्ला करणे या संबधित आहे.सदर कलमान्वये जन्मठेपेच्या शिक्षेचे प्रावधान आहे.

      तद्वतच भांदवी कलम ३२९ हे सांगते की,गंभीर दुखापत स्वच्छेने पोहोचवण्याचा कुणी प्रयत्न केला आणि त्यातून गंभीर दुखापत झाली तर सदर आरोपींना १० वर्षांपर्यंतच्या शिक्षाचे प्रावधान आहे.

        यामुळेच स्थानिक पत्रकारांनी,”गुन्हे दाखल सत्य प्रत,वारंवार मागितल्यानंतरही चिमूर पोलिसांनी त्यांना दिली नाही.गुन्हे दाखल करण्यात आलेली सत्य प्रत का म्हणून पत्रकारांना दिली नाही?,या बाबतचे गुलदस्त्यातील कोडे पोलिस विभागाला आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांनाच माहिती.

         मात्र,चिमूर तालुक्यातील नागरिकांकडून प्रश्न हा उपस्थित केला जात आहे की,भाजपा समर्थित आरोपी कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी प्रकरण दाबायचे होते म्हणूनच गुन्हा दाखल सत्य प्रत स्थानिक पत्रकारांना देण्यात आली नसावी.

         मात्र दैनिक देशोन्नती वृत्त पत्रामध्ये प्रकाशित झालेल्या बातमी नुसार १३ प्रकारच्या भांदवी कर्मातंर्गत दगडफेक करणाऱ्या आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपींवर गुन्हे दाखल केले असल्याचे पुढे आले. 

          तर ज्या आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले त्या सर्वांची नावे दैनिक नवराष्ट्र वृत्तपत्राने प्रकाशित केली आहेत.

          गंभीर गुन्ह्यांसंबंधातील सदर सर्व आरोपी हे भाजपा पक्षासी संबंधित असल्याचे जनमानसात बोलले जात आहे.

            गंभीर प्रकरणातंर्गत भाजपा समर्थित कार्यकर्ता (मोठ्या घरचे असल्याने) आरोपी झाल्याने चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी सत्तेचा दुरोपयोग करीत चिमूर उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांच्या कार्यालयात सतत २ दिवस डेरा टाकला आणि भाजपा समर्थित आरोपींना अटक करु नये असा समझोता केला असल्याच्या चर्चेला मोठ्या प्रमाणात चिमूर शहरात आणि तालुक्यात पेव फुटले आहेत.

            आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या सतत दोन दिवसाला अनुसरून दबावतंत्रानंतर चिमूर उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांनी भाजपा समर्थित गुन्हेगार आरोपींना अटक न करता समन्स देवून मोकळे केले आणि भविष्यात पोलिस स्टेशनसह इतर कार्यालयाच्या परत काचा फोडण्यासाठी व कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपाई आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यासाठी दिलासा दिला असल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे.

         अपराध क्र 151/2025, अंतर्गत Sec.189(2),189(5),191(2),191(3),195(1),195(2), 190,192,132,121(1),329(4),130 BNS सहकलम 3 सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम नुसार श्री.निखिल भुते,श्री.लल्ला असावा,श्री.पंकज शिरभये, श्री.शुभम भोपे,श्री.राकेश सटोणे,श्री.बबलू जाधव,श्री.गोलू भरडकर,श्री.धीरज सातपैसे,श्री.संदीप कावरे,श्री.तेजस बोरसरे,श्री.विक्की कटारे,श्री.मनमीत कुंभारे,श्री.गौरव गौरकर,श्री.हर्ष कटारे,श्री.पवन बंडे,श्री.गोलू कापसे,श्री.विशाल सोरदे,श्री.राम गुलाब माने,श्री.अभिषेक डायरे यांच्यावर आणि इतर २० ते २५ जणावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

          जर भाजपा समर्थित बाकीच्या आरोपींना अटक करायची नव्हती तर यापैकी केवळ,श्री.राम गुलाब माने आणि श्री.अभिषेक डायरे यांनाच चिमूर पोलिसांनी का म्हणून अटक केली?आता त्या दोघांची Mcr अंतर्गत 28 तारखेपर्यंत जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

         भाजपा मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी कितीही मोठा गुन्हा केला तरी त्यांना अटक करायची नाही.जास्तीचीच बोंबाबोंब झाली तर अटक करा आणि जमानतीवर सोडून द्या हा महाराष्ट्र राज्यात नवीनच पायंडा सुरू झाला असल्याने,याचे गंभीर परिणाम दूरगामी होणार असल्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.

          भाजपा आणि मित्रपक्षांच्या भुमिका,पक्ष कार्यकर्त्या आरोपी बाबत कायदेशीर कारवाई करण्याच्या नसल्याने पुढे चालून महाराष्ट्र राज्य गुन्हेगारीत ढकलल्या जाईल काय?याची भिती सामांन्य नागरिकांना आतापासूनच वाटू लागली आहे.

         मात्र,पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या,चिमूर पोलिस स्टेशनच्या काचा फोडणाऱ्या,चिमूर महिला पोलिस शिपाईनां दगडफेक अंतर्गत दुखापत करणाऱ्या,चिमूर पोलिस स्टेशन मध्ये जाऊन शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या,चिमूरच्या त्या सर्व भाजप समर्थित आरोपींना अटक होणार? याकडे चिमूर तालुक्यातील नागरिकांसह महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

         परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री-गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुक्कमा आरोपी बाबत काय भूमिका घेतात?याकडे चिमूर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.