Home Maharashtra कृषी वाहिन्यांना कमी दाब येत असल्याने माजी आमदार कृष्णा गजबे यांना निवेदन…

कृषी वाहिन्यांना कमी दाब येत असल्याने माजी आमदार कृष्णा गजबे यांना निवेदन…

ऋषी सहारे 

  संपादक

देसाईगंज :- तालुक्यातील कुरुड, कोंढाळा फिटरच्या कमी होल्टेज तसेच तालुक्यातील अन्य गावांमध्ये कृषी वाहिन्यांना कमी दाबाचा पुरवठा होत असलेल्या संदर्भात देसाईगंज उपविभागिय अभियंता विखार यांच्याकडून माहिती घेतली असता ब्रम्हपुरी 132 सबस्टेशन येथून कमी दाब देसाईगंज तालुक्यात येत असल्यामुळे मेंटेनन्स अधिकारी चंद्रपूर सी.ई.गजबे ई. ई. गाडेवार, यांच्याशी माजी आमदार कृष्णा गजबे यांनी समस्या जाणून घेतल्या.

      तात्काळ दाब कसा वाढेल आणि लवकरात लवकर या भागातील कृषी पंपांना सुरळीत वीज कशी येईल ही समस्या मिटवण्यासाठी प्रयत्न करू आणि लवकरात लवकर समस्या सुटेल असे आश्वासन दिले.

       यावेळी आत्ता शेतीचे फसल शेवटच्या टप्प्यातील असल्याकारणाने शेतकऱ्यांना विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी माजी आमदार कृष्णा गजबे यांना निवेदन दिले. यावेळी माजी आमदार कृष्णा गजबे यांना काही शेतकऱ्यांनी निवेदन दिले.

       सुनील पारधी तालुका अध्यक्ष भाजपा,दौलत ठाकरे, अरुण राऊत, सुशील ढोरे, विकास पारधी,अमित ठाकरे आदी उपस्थित होते.