Home Maharashtra शिक्षक भारती संघटनेचा हिंदी सक्तीला विरोध..‌ — सीबीएससी अभ्यासक्रमाला पाठिंबा…

शिक्षक भारती संघटनेचा हिंदी सक्तीला विरोध..‌ — सीबीएससी अभ्यासक्रमाला पाठिंबा…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..‌‌.

       शिक्षक भारती संघटना राज्य पदाधिकारी बैठक शुक्रवार दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी साने गुरुजी स्मारक पुणे येथे शिक्षक भारती राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

      या बैठकीला शिक्षक भारती संस्थापक कपिल पाटील,कार्याध्यक्ष सुभाष मोरे,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती अध्यक्ष नवनाथ गेंड,शिक्षक भारती प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर,धनाजी पाटील,सुभाष देवकर,राजेंद्र झाडे,भाऊराव पत्रे उपस्थित होते.बैठकीत विविध प्रश्नांवर विचारमंथन झाले.बैठकीत पुढील ठराव मंजूर करण्यात आले.

       शालेय शिक्षण विभागाने सीबीएससी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे.शिक्षक भारती संघटनेने या विषयाचे स्वागत तसेच माननीय शिक्षणमंत्र्यांचे अभिनंदन करण्याचा ठराव मंजूर केला.

      इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करू नये असा ठराव मंजूर करण्यात आला.हिंदी विषय ऐच्छिक असावा.हिंदी विषयाला गुजराती,तेलगू,कन्नड,तमिळ यापैकी कोणतीही जी विद्यार्थ्यांची मातृभाषा आहे ते निवडण्याचे स्वातंत्र्य असावे असा ठराव मंजूर करण्यात आला.

      15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा शासननिर्णय रद्द करण्यात यावा.या शासननिर्णयामुळे मुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होत आहेत.पूर्वीप्रमाणे संच मान्यता करून प्रत्येक विषयाला शिक्षक मंजूर करावा.तसेच कला क्रीडा साठी स्वतंत्र विशेष शिक्षक द्यावा हे ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले.

           बैठकीला राज्य पदाधिकारी,जिल्हाध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती नागपूर विभाग अध्यक्ष सुरेश डांगे,राजाराम घोडके,विशेष शाळा युनिटचे जिल्हाध्यक्ष महेश भगत,रामदास कामडी,पुरुषोत्तम टोंगे,नंदकिशोर शेरकी, राजेश घोडमारे,रावन शेरकुरे,विरेनकुमार खोब्रागडे यांनी दिली आहे.