Home आरोग्य कोलारा येथे मोखिक आरोग्य तपासणी शिबीर..‌ — ८२ रुग्णाची मोखिक आरोग्य...

कोलारा येथे मोखिक आरोग्य तपासणी शिबीर..‌ — ८२ रुग्णाची मोखिक आरोग्य तपासणी…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

      जागतिक मौखिक आरोग्य दिन 2025 च्या अनुषंगाने हॅपी मोऊथ,हॅपी माईंड या घोषवाक्या अन्वये गुरुवारी (दिनांक १७) जिल्हा मौखिक आरोग्य कक्ष चंद्रपूर आणि वनपरिक्षेत्र बफर,कोअर कोलारा ताडोबा व्याघ्र प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हापरिषद उच्च प्राथमिक शाळा,कोलारा येथे दुर्गम भागातील लोकांचे मौखिक आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.शिबिरात ८२ रुग्णांनी तपासणी करून लाभ घेतला.

        शिबिरात डॉ.जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी,डॉ. संदीप पीपरे यांनी मौखिक आरोग्यांची सखोल माहिती सांगून तंबाखूच्या सेवनाने कोण कोणते लक्षण दिसून येतात याबाबत मार्गदर्शन केले.

        तसेच वन विभागतील कोलारा झोन या गावातील नागरीकांची आणि वन विभागातील २८ गाईड्स, १० चालक असे एकूण ८२ रुग्णाची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली.

       शिबिरात डॉ.संदिप पिपरे,डॉ. प्राजक्ता खेळकर,डॉ. राजेश शेंन्डे व डॉ.आयुष दहिवडे यांच्या मार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली.

     यामध्ये OMSF ०८,संशयित रुग्ण २ असे एकूण दहा रुग्ण आढळले.

      मोखिक आरोग्य तपासणी शिबिरासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी योगिता मडावी,सरपंच शोभाताई कोयचाळे आणि ग्रामसेवक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

      शिबिराच्या यशस्वीतेसाठी सचिन जुमडे,दंत सहाय्यक व मित्रांजय यांनी परिश्रम घेतले.