Home Maharashtra ताडोबा बपर झोन अंतर्गत मुंबईच्या पर्यटकांचा अपघात…

ताडोबा बपर झोन अंतर्गत मुंबईच्या पर्यटकांचा अपघात…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी 

चिमूर :- ताडोबा जंगल सफारी करण्यासाठी निघालेल्या पर्यटकांच्या गाडी समोर अचानक जंगली डुक्कर आडवा आल्यामुळे त्याला वाचविण्याच्या नादात चालकांचे गाडी वरील नियंत्रण सुटले आणि चारचाकी वाहनाचा भयंकर अपघात झाला.

        ताडोबा बफर झोन क्षेत्रातील गोंडमोहाळी फाट्याजवळ आज दिनांक १९ एप्रिल ला सकाळी ६ वाजताच्या दरम्यान एका खासगी रिसार्ट वरून मुंबई येथील पर्यटक,स्वतः आपल्या चारचाकी वाहन क्रमांक,MH 48 -AT- 0566 या वाहणाने शिरकाळा बफर जंगल सफारी साठी जात होते.

     यात योगेश कमलिया (33) मुंबई,दीक्षा जया शेट्टी ( 34) हे सर्व मुबंई येथील आहेत.पर्यटक आपल्या चारचाकी वाहणाने

 सफारी करण्यासाठी निघाले असता जंगली डुकराला जोरदार धडक बसल्याने अपघात झाला.

     यात पर्यटक किरकोळ जखमी झाले आहेत.एकाच्या हाताला गंभीर मार आहे.त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्या जातं आहे.

    धडक एवढी जोरदार होती की त्या धडकेत जंगली डुकर जाग्यावरच ठार झाले.