प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
वादाचे वास्तविक कारण म्हणजे विधानसभा निवडणुकातंर्गत महाराष्ट्र राज्यात आलेली सत्ता साधूसंतामुळेच आली म्हणणे होय.
महाराष्ट्र राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत बऱ्याच उमेदवारांकडून अमाफ रुपये वाटण्यात आले होते हे प्रत्यक्ष महाराष्ट्र राज्यातील मतदारांनी अनुभवले होते.तद्वतच अनेक ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या माध्यमातून तथा सतर्क मतदारांच्या द्वारे उमेदवार रुपये वाटत असल्याचे उघडही झाले होते!.,मात्र रुपयांचे प्रकरणे लागलीच दाबण्यात आली हेही वृत्तपत्रातून पुढे आले होते.
याचबरोबर लोकसभा निवडणुकीनंतर लागलीच ६ महिण्यांनी महाराष्ट्र राज्यात,महाराष्ट्र विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या.या निवडणूक दरम्यान अच्यानक ४० लाख वाढीव मतदार महाराष्ट्र निवडणूक आयुक्तांनी महाराष्ट्र राज्यात कुठून आणले?,या गंभीर प्रश्नांचे उत्तर लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना अजूनपर्यंत पुराव्यासह महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तांनी दिले नाही.
तद्वतच लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्र राज्यातील ४० लाख वाढीव मतदारांचा मुद्दा लोकसभेत लावून धरला होता.मात्र लोकसभेत सुध्दा महाराष्ट्र राज्यातील ४० लाख वाढीव मतदारांचे उत्तर कोड्यातच ठेवण्यात आले.
यामुळे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तांची भुमिका आणि कार्यपद्धत संदेहास्पद आणि लोकशाहीला मारक असल्याचे दिसून आले आहे.
तद्वतच महायुतीची सत्ता महाराष्ट्र राज्यात आल्याबरोबर सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची दिलेली हमी आणि मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंतर्गत वाढीव निधी देण्याची केलेल्या घोषणांनी महायुतीला तारले आणि महाराष्ट्र राज्याची सत्ता महायुतीकडे वळती झाली हे प्रामुख्याने लक्षात घेतले पाहिजे.
यामुळे साधुसंतांमुळेच महाराष्ट्र राज्यात भाजपा समर्थित महायुती सत्तेत आली म्हणणे कितपत संयुक्तिक आणि योग्य आहे?याचे तर्कनिष्ठ आणि तर्कशुद्ध उत्तर महाराष्ट्र राज्यातील मतदारांना आणि जनतेला साधुसंतांकडून आणि महाराष्ट्र राज्याच्या सत्ताधाऱ्यांकडून कळायला पाहिजे.
तद्वतच महाराष्ट्र राज्यातील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत मताधिकार बजावल्यामुळेच २८८ आमदार निवडून आले हे खरे कारण आहे.
महाराष्ट्र राज्याच्या मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावल्यामुळे महाराष्ट्र राज्यात आमदार निवडून आले असतील तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आमदार हे साधुसंतांमुळे निवडून आले असल्याचा मुद्दा आता कुणी पुढे केला?आणि का म्हणून पुढे केला?,यासंबधाने सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना येनकेन प्रकारे अशांत करत राहणे आणि पडद्यामागे अवाजवी आंदोलन करणे,हा एक नवीनच फंडा महाराष्ट्र राज्यात सुरु झालेला दिसतो आहे.
महाराष्ट्र विधानसभेतील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पक्षनेते आमदार तथा माजी मंत्री विजय वडेट्टीवार हे संबधीत सांधूवर सविस्तर काय बोलले याचे पाहिजे तसे सखोल कारण अजूनही पुढे आले नाही.
आमदार विजयभाऊ वडेट्टीवार हे महाराष्ट्र राज्यातील एक मुरब्बी राजकारणी असून त्यांना कायदेशीर परिभाषा कळतय असे म्हणावेच लागेल…
बहुजन समाजातून ते येत असल्याने त्यांच्या रोखठोक बोलण्यात बहुजन समाजातील नागरिकांचे हित दडलेले असते.
याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या माध्यमातून आमदार विजयभाऊ वडेट्टीवारांचे जे वक्तव्य सदर सांधूबाबत दाखविण्यात येत आहे,त्या वक्तव्याच्या आधारे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही असे प्रथमदर्शनी निदर्शनास येते आहे.
महाराष्ट्र राज्यातील मतदारांनी मताधिकारांचा कौल कुणाच्या बाजूंनी दिला,हे निवडणूक विभागासह ईव्हीएम मशीन आणि पेपर टेल मशिनलाच माहिती…
पण,महाराष्ट्र निवडणूक आयुक्तांसह ईव्हीएम मशीन आणि पेपर टेल मशिन म्हणत असेल की महायुतीला सत्तेची संधी दिली तर आता याबाबत वाद नकोय.
मात्र,साधूसंतामुळेच महायुतीचे सरकार सत्तेवर आले या म्हणण्या मागे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीला लोंबकळत ठेवण्याचे कारण आहे काय?याकडे सुध्दा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे….



