Home देशविदेश सावरी (बिडकर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी…

सावरी (बिडकर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी…

शुभम गजभिये

विशेष प्रतिनिधी…

        चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा सावरी (बिडकर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात युगप्रवर्तक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

        या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच लोकनाथ रामटेके हे होते तर मुख्य मार्गदर्शक म्हणून दिलीप मोटघरे सदस्य ग्रामपंचायत सावरी,आशिष घोनाडे सदस्य ग्रामपंचायत सावरी,रामदास खामनकर सदस्य ग्रामपंचायत सावरी,बुध्दरत्न शेंडे समाज सेवक सावरी,सुरेखा शेबेकर सदस्यां ग्रामपंचायत सावरी,अर्चना हनवते सदस्यां ग्रामपंचायत सावरी,आदीं मान्यवर उपस्थित होते.

        विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी भारतीय संविधान निर्मात्याला पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले.

      यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर मनोगतातंर्गत सरपंच लोकनाथ रामटेके यांनी विविध प्रकारे प्रकाश टाकलाय..