शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले तथा युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयती उत्सव कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा पळसगाव (पिपर्डा) येथे सुरुवात झाली आहे.
सामाजिक क्रांतीचे जनक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि जगमान्य थोर समाजसुधारक विश्वभुषण विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचे स्मरण तथा गौरव करण्यासाठी मौजा पळसगाव (पिपर्डा) येथे रॅली काढण्यात आली होती.
जयंतीच्या या प्रारंभीक कार्यक्रमाला सौ.सरीता गुरुनुले सरपंच ग्रामपंचायत पळसगांव,सौ.रागिना दडमल पोलीस पाटिल पळसगांव,पोलीस प्रोटेक्शन.तुळसिदास शेरकुरे उपसरपंच ग्रामपंचायत पळसगांव,कैलास खोब्रागडे अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखेचे अध्यक्ष,संजय जुमळे अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखेचे सचिव,आणि गावातील सर्व महिला भगिनींनी तथा पुरुष बांधवांनी सहभाग नोंदविला होता.
मौजा पळसगाव (पिपर्डा) येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतींना अनुसरून मुख्य कार्यक्रम सायंकाळी होणार आहेत.


