Home देशविदेश क्रेन ने महिलेला चिरडले,जागीच मृत्यू,आंबेनेरी येथील घटना… — ४ तास रस्ता...

क्रेन ने महिलेला चिरडले,जागीच मृत्यू,आंबेनेरी येथील घटना… — ४ तास रस्ता रोको आंदोलन,क्रेन मालक आल्याशिवाय प्रेत उचलणार नसल्याच्या आंबेनेरीवाशियांच्या पावित्र्याने पोलिस प्रशासन झाले सतर्क… — चंद्रपूर वरुन पोलिसांची कुमक बोलावण्यात आली.‌.. — श्री.मधुकर डांगे यांच्या परिवाराला क्रेन मालकाकडून तात्काळ आर्थिक मदत हवी…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

        भाग्य जाणले कुणी?कोण किती दिवस जगणार आणि कोण केव्हा मरणार आणि कशाने मरणार हे सांगता येत नाही.अशीच घटना आज चिमूर तालुक्यातील मौजा आंबेनेरी येथे घडली आहे.

          सौ.शारदा मधुकर डांगे ही महिला हांतपंवर पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेली होती.परत येत असताना सदर महिलेला भिसी-आंबेनेरी-जांभुळघाट या राष्ट्रीय मार्गावर म्हणजे मौजा आंबेनेरी येथेच सकाळी ९ वाजताच्या दरम्यान चिरडले.यामुळे सौ.शारदा मधुकर डांगे या महिलेचा जागीच मृत्यू झाला.मृत्यू समयी सौ.शारदा मधुकर डांगे यांचे वय जवळपास ५५ असल्याचे कळले आहे.

            क्रेन द्वारे अपघातातंर्गत सौ.सारदा मधुकर डांगे यांचा जाग्यावरच मृत्यू झाल्याची माहिती गावात व परिसरात वेगाने पसरली.यामुळे क्रेन मालक जोपर्यंत अपघात स्थळावर येत नाही तोपर्यंत सौ.शारदा मधूकर डांगे यांचा मृतदेह हलविण्यात येणार नाही अशी भूमिका मौजा आंबेनेरी वासियांनी घेतली होती.

            मौजा आंबेनेरी येथील नागरिकांद्वारे सतत चार तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.अपघात प्रकरणाचा निपटारा करण्याचे यशस्वी प्रयत्न भिसी ठाणेदार जितेंद्र चांदे यांनी केल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह चिमूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

         चंद्रपूर जिल्हातंर्गत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भिसी ठाणेदार जितेंद्र चांदे हे चिघडलेले प्रकरण शांत करु इच्छित होते.

       साहाय्यक ठाणेदार वाघ,पोलिस उपनिरीक्षक शुभांगी पाटील आणि इतर पोलिसांच्या कुमक द्वारे प्रकरण शांत करण्यास ठाणेदार जितेंद्र चांदे यांना यश आले.

        रस्ता रोको आंदोलन सुरु असताना चंद्रपूर वरुन सुध्दा सुरक्षा कुमक बोलावण्यात आली होती.

        अपघातात मरण पावलेली महिला मजूर असून मजूरीच्या द्वारे ती कुटुंबाचा गाडा हाकत होती.सदर डांगे कुटुंबावर अपघातातंर्गत अचानक गंभीर आघात झाल्याने गावात शोकमय वातावरण आहे.

अपघात घटना भारत देशांतर्गत महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्हातंर्गत,चिमूर तालुक्यातील मौजा आंबेनेरी येथील आहे.