Home देशविदेश डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे भारतातील प्रमुख सण….

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे भारतातील प्रमुख सण….

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

            वृत्त संपादीका 

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती (आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. 

      हा सण दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो.हा सामाजिक,सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे.महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.

      आंबेडकरवादी लोक या दिनाला ‘समता दिन’ म्हणून तर महाराष्ट्र शासन,”ज्ञान दिन,म्हणून साजरा करते.

     डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती अंतर्गत भीम जन्मोत्सव

साजरा करणारे १०० पेक्षा अधिक देश आहेत.

     डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक जन्मदिवशी त्यांचे अनुयायी,त्यांचे जन्मस्थळ भीम जन्मभूमी स्मारक तसेच दीक्षाभूमी,चैत्यभूमी,इतर संबंधित स्थळे,सार्वजनिक ठिकाणे,शहरे,गावे,शाळा-महाविद्यालये,विद्यापीठे तसेच भारतासह जगभरातील अनेक बौद्ध विहारात त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात.

     जगातील १०० पेक्षा अधिक देशांत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते.

      डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती ही एक प्रादेशिक सुट्टी नेहमीच १४ एप्रिल रोजी पाळली जाते.आंध्र प्रदेश,बिहार,गोवा,गुजरात, हरियाणा,हिमाचल प्रदेश,जम्मू व काश्मीर,कर्नाटक,केरळ,महाराष्ट्र, ओडिशा,पंजाब, राजस्थान,सिक्किम,तामिळनाडू,तेलंगणा,उत्तर प्रदेश,उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आंबेडकर जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते.

    नवी दिल्ली,येथील भारतीय संसदेमध्ये त्यांच्या पुतळ्याला दरवर्षी भारताचे राष्ट्रपती,उपराष्ट्रपती,प्रधानमंत्री, केंद्रीय मंत्री,लोकसभापती,राज्यपाल, इतर मंत्री व सर्व राजकिय पक्षाचे राजकारणी आणि आंबेडकरवादी जनता अभिवादन करून त्यांना विनंम्रपणे अभिवादन करतात.

      भारतीय बौद्ध धर्मीय,बुद्ध विहार तसेच आपल्या घरातील आंबेडकरांच्या प्रतिमेला वा पुतळ्याला समोर ठेवून त्रिवार वंदन करतात. 

      विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते,लोक संचालन करतात,ढोल वाजवून आनंद व्यक्त करत मिरवणूक काढतात.बहुजन समाजासह सर्व लोकही आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या उत्साहाने त्यांची जयंती साजरी करतात.