Home Maharashtra महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती साजरी….

महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती साजरी….

राजेंद्र रामटेके 

विशेष प्रतिनिधी 

देसाईगंज :- सामाजिक सुधारणांचे प्रणेते, महिलांच्या शिक्षणासाठी जीवनभर झटणारे आणि समतेचे प्रतीक असलेले महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती आमदार  रामदासजी मसराम सर (६७ – आरमोरी विधानसभा क्षेत्र) यांच्या जनसंपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली.

          या प्रसंगी महात्मा फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान त्यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकण्यात आला आणि उपस्थितांनी त्यांच्या विचारांचे स्मरण करून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

         कार्यक्रमाला कमलेश बारस्कर, विलास बन्सोड, उपसरपंच बोळधा राजू गायकवाड, मनोज ढोरे (सावंगी), प्रमोद शहारे (सावंगी) यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होत.

         कार्यक्रमाचे संयोजन भावपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडले.