शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर:-
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त विविध गावांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जयंती दिनाच्या कार्यक्रमानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्रपणे अभिवादन करण्यात आले आणि त्यांच्या इतिहासिक कार्यावर मनोगतातंर्गत माहिती देण्यात आली.
सि.यु.मंडळाचे नवतरुण बाईक रलीचे आयोजन करुन बुध्द विहारास भेट दिली व तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, संविधान निर्माता युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी श्रध्दापुर्वक अभिवादन केले.
मौजा पिपर्डा,विहिरगांव,अडेगांव,मानेमोहाळी,मासळ (बु),कोलारा,गोडमोहाळी,येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पळसगाव येथे अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखेचे अध्यक्ष कैलास खोब्रागडे,सचिव संजय जुमडे,माळी समाज अध्यक्ष मारोती शेंडे,सचिव दिनकर शेंडे,अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखेचे माजी सचिव प्रभाकर गजभिये,नरेश पाटिल,प्रदिप गजभिये,शंकर वाटगुरे,विजय गजभिये,मनोहर मेश्राम,उपासक उपासिका कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.



