Home Maharashtra धानोरा येथे केंद्रीय रिझर्व पोलीस बल चा स्थापना दिवस साजरा… 

धानोरा येथे केंद्रीय रिझर्व पोलीस बल चा स्थापना दिवस साजरा… 

भाविकदास करमनकर 

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

 दरवर्षीप्रमाणे यंदाही धानोरा मुख्यलय येथे मुख्यालयामध्ये 113 बटालियन केंद्रीय रिझर्व पोलीस बल यांचा 35 वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जस्वीर सिंग कमांडंट 113 बटालियन यांच्या उपस्थितीत साजरा झाला याप्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

        शहीद वीर जवानांना मानवंदना देऊन श्रद्धांजली देण्यात आली.  याप्रसंगी कॅम्प परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी जवानांना 113 बटालियनच्या इतिहासाची माहिती देण्यात आली 113 बटालियनची स्थापना एक एप्रिल 1999 मध्ये समूह केंद्र रंगा रेड्डी आंध्र प्रदेश या राज्यात उभी करण्यात आली.

        आंध्र प्रदेश नागालँड पंजाब त्रिपुरा जम्मू काश्मीर व 23 /10/ 2009 ला महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा येथे नक्षल ऑपरेशन साठी तैनात करण्यात आली सैनिक संमेलनाच्या कार्यक्रमादरम्यान जवानांना शारीरिक व मानसिक स्वस्थ रहावे व आपल्या कर्तव्याचे पालन करावे असे सांगितले.

         या कार्यक्रमाचे औचित साधुन जवानांमध्ये व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित सुद्धा करण्यात आला होता.

        या कार्यक्रम प्रसंगी जस्वीर सिंग कमांडेंट अनिल कुमार शर्मा द्वितीय कमांडेन्ट रामकृष्ण डिप्टि कमांडंट गुलाब सिंग डिप्टी कमांडेंट बाबू सिंग डिप्टी सहाय्यक कमांडेन्ट आदित्य पुरोहित वैद्यकीय अधिकारी व जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.