Home Maharashtra उशिरा सुचलेले योग्य शाहानपण… — वाळू चोरीवर लगाम लावणारे भरारी पथक...

उशिरा सुचलेले योग्य शाहानपण… — वाळू चोरीवर लगाम लावणारे भरारी पथक आणि तहसीलदार श्रिधर राजमाने… — प्रशासकीय मंजुरी अंतर्गत बांधकामांना तहसीलदार परवानगी नुसारच वाळूचा पुरवठा व्हावा? — काही पत्रकार कर्तव्यदक्ष!..

उपक्षम रामटेके/शुभम गजभिये..

           अवैध वाळू उत्खननाकडे होणारे दुर्लक्ष अनेकांचा जिव गमावन्यात गेला व करोडो रुपयांचा महसूल डूबविण्यात झालाय.

         या सत्याला मान्य केले तर बिनधास्तपणे होणारे वाळूचे अवैध उत्खनन अधिकाऱ्यांच्या आणि सत्तेच्या आशिर्वादातच सुरू असावे असा संशय चिमूर तालुक्यातील नागरिकांना होता आणि आहे.

        वाळूच्या अवैध उत्खननावर लगाम लावण्यापेक्षा आडमार्गाने खुलेआम दिलेली सुट चिमूर तालुक्यातील नागरिकांना पचनी पडत नव्हती.

             याचबरोबर चिमूर तालुक्यातील अवैध वाळू उत्खननाकडे चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने आणि पोलिस प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावे यासाठी प्रदीप रामटेके यांच्या सह चिमूर तालुक्यातील निष्पक्ष तथा कर्तव्यदक्ष पत्रकारांनी अवैध वाळू उत्खननाचे प्रकरण लावून धरले होते.

       दखल न्यूज भारतचे मुख्य संपादक प्रदीप रामटेके हे न घाबरणारे निष्पक्ष तथा कर्तव्य दक्ष पत्रकार आहेत.त्यांनी तर अवैध वाळू उत्खननाकडे जातीने लक्ष दिले व अवैध वाळू उत्खननामुळे होत असलेल्या नुकसानीवर जातीने प्रकाश टाकलाय.

     प्रदीप रामटेके हे वेळप्रसंगी कायद्यावर बोट ठेवून अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे कर्तव्य काय आहेत?यावर मार्मिक तथा बोलके भाष्य बातम्यांच्या माध्यमातून करतात,हे एकप्रकारे समाजहितांचेच कार्य आहे.

               पत्रकार विलास मोहिनकर,सुनील हिंगणकर,उपक्षम रामटेके,केवलसिंग जुनी,शुभम गजभिये यांनी अवैध वाळू उत्खननाकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बातम्यांच्या माध्यमातून पार पाडलेले उत्तम कर्तव्य समाजमन ढवळून काढणारे आणि शासन-प्रशासनाला सहकार्य करणारे होते.

            अवैध वाळू उत्खननाच्या बातम्यांमुळेच तहसीलदार श्रिधर राजमाने यांनी अवैध वाळू उत्खननावर लगाम लावण्यासाठी,”भरारी पथक,तयार करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह व त्यांच्या उत्तम कर्तव्याचा कार्यभाग आहे.

            तहसीलदार श्रिधर राजमाने यांनी अवैध वाळू उत्खननाकडे जातीने लक्ष देत वाळू चोरट्याविरुद्ध जोरदार मोहीम हाती घेतली असे म्हणण्यास हरकत नाही!

        पण,त्यांनी फिरत्या भरारी पथकाचे नेतृत्व करताना भरारी पथकाचे दमन होणार नाही याकडे सुध्दा न थकता लक्ष देणे आवश्यक आहे.

       चिमूर तालुक्यातील नागरिकांना बांधकामासाठी लागत असलेली वाळू निःशुल्क व विनापरवाना देण्यात यावी,तथा चिमूर तालुकातंर्गत प्रशासकीय मंजुरीच्या बांधकामांना लागत असलेली वाळू सुध्दा शासकीय नियमानुसारच उपलब्ध करून द्यायला हवी.

           चिमूर तालुका अंतर्गत प्रशासकीय बांधकामांना लागत असलेली वाळू विना परवाना उपयोगात आणल्या जात असेल तर सदर कंत्राटदारांवर वाळू चोरीचा गुन्हा तहसीलदार चिमूर यांनी दाखल केला पाहिजे,व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुध्दा कायदेशीरपणे झाली पाहिजे या मताची जनता आहे.

      कुठला कंत्राटदार,तहसीलदार परवानगी नुसार वाळू बांधकामांसाठी पावरतो आणि कुठला कंत्राटदार तहसीलदार परवानगी विना वाळू बांधकामांसाठी पावरतो हे तहसीलदार यांना जाग्यावरच कळतय!

      यामुळे कंत्राटदार यांनी प्रशासकीय मंजुरी न घेता बांधकामांसाठी वाळू वापरली तर अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असेही समाजमन आहे.

       काही का असेना,चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांनी,”अवैध वाळू,चोरांवर लगाम लावण्यासाठी,”तयार केलेले भरारी पथक,त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे,हे सत्यच आहे…

       पण, तहसीलदार श्रिधर राजमाने यांचे,”भरारी पथक तयार करणारे कर्तव्य स्वागतार्ह आहे आणि चिमूर तालुक्यातील नागरिकांना दिलासा देणारे आहे.

    एवढे नक्की!