महादेव, महेश्वर(शिव, शंकर) हे तथागत भगवान बुद्धा चे उपासक होते..
हे सिद्ध करण्यासाठी ‘ चिनी बौद्ध यात्री हेनसांग की भारत-यात्रा ‘ या पुस्तकातील एक प्रसंग तुमच्या माहितीकरिता खाली देत आहे.
बोधी वृक्षाच्या पूर्वेला एक विहार 160 किंवा 170 फूट उंच आहे. त्या विहाराचा पाया जवळपास 20 पाऊले (कदम) आहे. संपूर्ण इमारत निळ्या रंगाच्या विटांची आहे ज्याच्यावर चुन्याचे प्लास्टर आहे. त्यामध्ये जितके भाग आहे त्या भागामध्ये जितके कप्पे (आज याला आपण रॅक किंवा कपाट म्हणतो) आहे सर्वांमध्ये सोन्याच्या मुर्त्या आहे.
या ठिकाणाच्या चारही बाजूंनी अतिशय सुंदर चित्रकारी आणि नक्षीकाम केलेले आहे. काही ठिकाणी तर चित्र मोत्यांनी घडवलेले आहे. अनेक ठिकाणी मुनी यांच्या मूर्ती आहे त्या मुर्त्यांना चारही बाजूंनी तांब्याचा मुलामा आहे.
पूर्वेकडे सिंहद्वार आहे आणि ते तीन खंडांचे आहे. त्याचे सज्जे, खंबे, कड्या, खिडक्या हे सर्व सोने आणि चांदीने मडविले आहे आणि मध्ये मध्ये मोती आणि रत्न इत्यादींनी जडविले आहे.
तीनही खंडा मधून गुप्त कोठे आणि अंधकारमय तहखान्यामध्ये जाण्यासाठी वेगवेगळ्या रस्ता आहे. दाराच्या बाहेरून आणि उजवीकडून आणि डावी कडच्या दोन्ही दोन आले इतके मोठे मोठे आहे की त्या मोठ्या कोठारीचे तार असते.
डावीकडच्या आल्यामध्ये अवलोकितेश्वर बोधिसत्व ची प्रतिमूर्ती आहे आणि डाव्या कडील वाल्यामध्ये मैत्रीय बोधिसत्व ची प्रतिमा आहे. या दोन्ही मूर्ती चांदीच्या बनलेल्या असून श्वेत रंगाच्या आहे आणि जवळपास दहा फूट उंच आहे.
ज्या ठिकाणावर हे विहार उभे आहे, ठीक त्याच ठिकाणावर पूर्वी एक लहानसे विहार सम्राट अशोक यांनी बनविला होता. त्यानंतर आलेल्या एका ब्राह्मणाने(आजच्यासारखी त्याकाळी ब्राह्मण ही जात नव्हती तर ते एक विशेषण होते म्हणून विद्वान व्यक्तीला ब्राह्मण म्हटल्या जात असे) त्या विहाराचा आकार मोठा केला.
पूर्वी या ब्राह्मणाचा(हा ब्राह्मण म्हणजे आजचा वैदिक ब्राह्मण नव्हे) बुद्ध धर्मावर विश्वास नव्हता कारण तो महेश्वराचा उपासक होता. एकदा त्याने असे ऐकले की त्याचा ईश्वर (महेश्वर, महादेव) हिमालय पर्वतांमध्ये राहत आहे. तेव्हा त्या ब्राह्मणाने आपल्याला लहान भावाला सोबत घेतले आणि महादेव जा ठिकाणी आहे तेथे प्रार्थना करण्यासाठी गेला.
तेव्हा देवता (महादेव) त्याला म्हणाला,”माझी प्रार्थना करून जर तुला काही मिळवायचे असेल तर त्याच्यासाठी तुझ्या ठिकाणी काही धार्मिक बळ सुद्धा असणे आवश्यक आहे. जर तुझ्यासारख्या प्रार्थना करणाऱ्या जर पुण्या बळ नसेल तर तुला काहीही मागण्याचा अधिकार नाही आणि मी सुद्धा तुला काही देऊ शकत नाही.”
त्या ब्राह्मणाने महादेवाला विचारले,” ते असे कोणते पुण्य कर्म आहे की जे केल्याने माझी मनोकामना पूर्ण होऊ शकेल.”
महादेवाने उत्तर दिले,” जर तू तुझ्या पुण्यकर्माची मुळे मजबूत करू इच्छित असेल तर त्यासाठी तुला उत्तम ठिकाणाचा (प्रदेशाचा) शोध घ्यावा लागेल. संबोधी (बुद्धत्व) प्राप्त करण्याचे उत्तम ठिकाण बोधीवृक्ष आहे. तू सरळ त्याच ठिकाणी जा आणि बोधी वृक्षाच्या जवळच एक मोठे विहार आणि तलाव निर्माण कर आणि सर्व प्रकारच्या वस्तू धार्मिक कृत्य (पूजा पाठ) करण्यासाठी दान कर. हे पुण्य कार्य केल्याने तुझी मनोकामना अवश्य पूर्ण होईल.”
ब्राह्मणाने महादेवाची ही आज्ञा समजून त्याने त्या आदेशाला श्रद्धा पूर्व धारण करून परत आला. मोठ्या भावाने विहाराची निर्मिती केली आणि लहान भावाने तलाव बांधला(संदर्भ: चिनी बौद्ध यात्री हेनसांग की भारत-यात्रा, पृ.क्र.299, मराठी अनुवाद प्रा. गंगाधर नाखले)
भारतातील भ्रमवाद्यांनी बुद्ध धम्मातील हा सातव्या शतकातील कन्सेप्ट किंवा हा प्रसंग उचलला आणि नवव्या शतकामध्ये पहिल्या शंकराचार्याने शैव पंथाची स्थापना केली.
म्हणजेच भारतातील ब्राह्मणी धर्म हा पूर्णपणे बुद्ध धम्माची नक्कल करून उभा झालेला आहे. आज जे लोक शिवाची शंकराची, महेश्वराची महादेवाची पूजा करतात ते नकळतपणे बुद्धाच्या उपासकाचीच पूजा करीत असतात. या देशातील समस्त हिंदूंचे पूर्वज हे बुद्धिस्ट होते म्हणून आजचा आमचा बहुजन हिंदू बांधव हा पूर्वीच्या बुद्धिस्टांचा वंशजव आहे.
या देशातील ओबीसी एसटी एससी यांना जरी महादेव हा तथागत भगवान बुद्धाचा उपासक होता हे माहिती नसले तरी भ्रम वाद्यांना हे चांगले माहिती आहे म्हणून तर त्यांनी मनुस्मृतीमध्ये महादेवाचा नंदी आणि गणपती बद्दल गैरउद्गार काढलेले आहे.



