Home देशविदेश प्रियदर्शी राजा सम्राट अशोक जयंतीच्या कार्यक्रमांचे आयोजन…

प्रियदर्शी राजा सम्राट अशोक जयंतीच्या कार्यक्रमांचे आयोजन…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी… 

चिमूर :- चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांच्या २३२९ व्या जयंती निमित्त आज ५ एप्रिल २०२५ शनिवारला सायंकाळी ५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (इंदिरा नगर) चिमूर येथे आयोजन करण्यात आले आहे.

           या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास राऊत उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.नरेंद्र मेश्राम,हरी मेश्राम सर,महेंद्र लोखंडे सर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

          तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समन्वय समिती तालुका चिमूर,संबोधी बुद्ध विहार चिमूर,तक्षशीला बुद्ध विहार चिमूर,लुम्बिनी बुद्ध विहार चिमूर,संविधान सन्मान सोहळा समिती चिमूर,धम्मांजली महिला मंडळ चिमूर यांनी केले आहे.