राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
कूरखेडा – शहराचा सतीनदीचा घाटावरील नवनिर्मित रखडलेल्या पूल बांधकामाची आज दि.२ एप्रील बूधवार रोजी सांयकाळी ५ वाजता आमदार रामदास मसराम व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पाहणी करीत बांधकामाचा संतगतीबाबत नाराजी प्रकट करीत पावसाळ्यापूर्वी बांधकाम पूर्ण करीत आवागमनाकरीता नागरीकांना अडचण होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचणा उपस्थीत बांधकाम कंपनीचे डी पी एम राठोड याना केली.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचा वतीने सतीनदीवर मागील वर्षापासून पूर्वी असलेल्या लहान पूलाला तोडत मोठ्या पूलाचे बांधकाम सूरू करण्यात आले आहे मागील वर्षी पावसाळ्यात येथील वाहतूक बंद पडल्याने ग्रामीण भागातील नागरीकाना तसेच कोरची छत्तीसगढ़ कडे जाणार्या वाहन धारकाना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला होता.
यावेळी पर्यायी मार्ग सूद्धा १५ कीलोमीटर अधिक लांबीचा,अरूंद व खडतर असल्याने वाहन व वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता यावर्षी सूद्धा बांधकामाची संत गती मूळे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल की नाही असा प्रश्न उभा होत तालुका वासीयात चिंता निर्माण झाली आहे.
येथील नागरीकाना मागील वर्षी सोसाव्या लागलेल्या यातणा पून्हा सोसाव्या लागू नये याकरीता वेळेत बांधकाम पूर्ण होईल याची खबरदारी घेण्याचे निर्देश यावेळी आमदार मसराम यानी बांधकाम स्थळाला भेट देत संबधिताना दिले.
यावेळी एका आठवड्यात नवनिर्मित पूलाचा पील्लर वर गडर मांडण्याचा कामाला सूरवात करीत यानंतर स्लॅब टाकत कामाला गती देण्याचे आश्वासन उपस्थीत डी पी एम राठोड यानी दिले.
यावेळी कांग्रेस तालुका अध्यक्ष जिवन पाटील नाट शिवसेना उबाठा गटाचे नेते आशिष काळे नगराध्यक्ष अनीताताई बोरकर महिला व बालकल्याण सभापती प्राचीताई धोंडणे नगरसेवक जयेन्द्रसिंह चंदेल,आशाताई तूलावी,संध्याताई नैताम,कपील पेंदाम, आनंदराव जांभूळकर, नगरसेवीका हेमलता नंदेश्वर नगरसेवीका कूंदाताई तितीरमारे यूवक कांग्रेस तालुका अध्यक्ष प्रांजल धाबेकर, भावेश मुंगणकर,राजू बावनथडे,चिरकूटाजी नैताम, प्रतिभा सिडाम तसेच शहर वासीय उपस्थीत होते.



