Home शैक्षणिक रा.म.गांधी महाविद्यालय,सावली येथे संशोधन पेपर लिखाण ह्या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न…

रा.म.गांधी महाविद्यालय,सावली येथे संशोधन पेपर लिखाण ह्या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

         भारत शिक्षण प्रसारक मंडळ, सावलीच्या अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली जिल्हा चंद्रपूर च्या वतीने दिनांक 29 मार्च २०२५ ला दुपारी 12.00 वाजता स्व.वामनराव गड्डमवार सभागृहात विद्यापीठ स्तरीय संशोधन पेपरचे लिखाण ह्या विषयावर एक दिवसीय कार्य शाळेचे आयोजन करण्यात आले.

         ह्या कार्यशाळेला अध्यक्ष स्थान म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.चंद्रमौली उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.एस. बी किशोर, संगणक विज्ञान प्रमुख, तसेच संशोधन केंद्र प्रमुख विषय प्रमुख संगणक विज्ञान हे उपस्थित होते. 

        ही विद्यापीठ स्तरीय एक दिवसीय संशोधन पेपरचे लिखाण ह्या विषयावरील कार्य शाळा आयोजित करण्याचे प्रमुख उद्देश हा होता की, महाविद्यालयीन विद्यार्थांना संशोधन लिखाण कसे करावे, संशोधनात कोणत्या बाबी लिखाणात असाव्या, कोणत्या बाबी लिखाणात नसाव्यात, लिखाणाचे तत्वे,संशोधन लिखाण करतांना येणाऱ्या अडचणी इत्यादी विषयावर प्रकाश पाडणे हा होता.

         ह्या कार्यशाळेचे अध्यक्षनिय भाषणात डॉ. ए चंद्रमौली यांनी विद्यार्थ्यांना संशोधन लिखाण करतांना कोणत्या तत्वे आणि मूल्याचे पालन करणे आवश्यक आहे, लिखाण करतांना कोणत्या बाबी टाळाव्यात ह्या बाबीवर मागदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले डॉ. एस . बी. किशोर यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे संशोधन पेपर चे नियोजन कसे करावे, विद्यार्थांना संशोधन लिखाण करतांना घ्यावयाचे काळजी, संशोधन लिखाणाचा क्रम, संशोधन लिखाणातील चुका कसे टाळावे, संशोधन साहित्यिक चोरी (प्लागिरिशम), संदर्भ ग्रंथ, ह्या बाबीवर सूक्ष्म पद्धतीने प्रकाश टाकला. 

           ह्या कार्यशाळेला प्रामुख्याने कला, वाणिज्य व विज्ञान ह्या तिन्ही शाखेचे भरपूर विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.विनोद बडवाईक यांनी केले. संचालन प्रा.डॉ.विजयसिंग पवार, कार्यक्रम समन्वयक यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. प्रफुल वैराळे यांनी केले. ह्या कार्यशाळेला महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.