Home Maharashtra कामचुकार अधिकारांना माफी नाही :- खा.डॉ.प्रशांत पडोळे — जिल्हाधिकारी भंडारा यांच्याशी...

कामचुकार अधिकारांना माफी नाही :- खा.डॉ.प्रशांत पडोळे — जिल्हाधिकारी भंडारा यांच्याशी केला संपर्क…

  शेखर इसापूरे

     उपसंपादक

     दखल न्यूज भारत

भंडारा :- पंचायत समिती सभागृह भंडारा येथे तालुक्यातील विविध विभागाचा आढावा घेण्यात आला.

           भंडारा पंचायत समिती, नगर परिषद, आरोग्य विभाग, कृषी विभाग, वनविभाग, mseb, पोलिस, महसूल, अधिकारी, पाणी पुरवठा विभाग, अन्य विभागाच्या कर्मचारी यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला.

             मात्र समाधानकारक कार्य दिसून आले नाहीत, आकडे वारीत तफावत, लाभार्थ्यांना सहकार्य न करणे, त्यांची वेळेत कामे न करणे, आम जनतेला वुळवा उडविचे उत्तर देत राहणे हा सर्व प्रकार मात्र या ठिकाणी दिसून आला, अनेक ठिकाणी कामचुकारपणा दिसून आला.

         अधिकारी सामान्य जनतेला किती त्रास देतात ते दिसून आले.सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळाला गेला पाहिजे, कुणावर अन्याय होता कामा नये, जनतेची कामे वेळेत करा, विविध क्षेत्रातील घटनेचे गांभीर्य घ्या. त्यांचे पंचनामे त्वरित करा, त्यांना शासनाकडून मोबदला त्वरित द्या. विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी अनुउपस्थित होते. विविध कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. पुढच्या वेळी बैठकीला येतांना तयारी करून येण्याच्या सूचना यावेळी केल्या. 

         यावेळी आढावा बैठकीला उपस्थित सौ.कल्पणाताई कुर्झेकर पं.स सभापती भंडारा, श्री.नागेशजी भगत उपसभापती पं.स.भंडारा, श्री. नरेशजी डहारे माजी सभापती जि.प.भंडारा, श्री.प्रेमजी वणवे जि.प.सदस्य, श्री.विनोदजी बांते जि.प.सदस्य, सौ. जयश्रीताई बोरकर अध्यक्षा महिला काँग्रेस कमिटी जि.भंडारा, श्री.प्यारेलालजी वाघमारे, श्री. प्रविनजी उदापुरे माजी सिनेट सदस्य, तहसिलदार भंडारा, बीडीओ भंडारा तसेच  विविध भंडारा विभागातील अधिकारी, कर्मचारी, परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.