Home Social ज्ञानगंगाच्या वर्धापनदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…

ज्ञानगंगाच्या वर्धापनदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी :- येथील ज्ञानगंगा इंग्लिश स्कूलच्या नवीन वास्तूच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात एकूण १०३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आला.

          याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजय गुळवे, सचिव वैष्णवी गुळवे, माजी उपनगराध्यक्ष रामभाऊ भोसले, भाजपाचे निमंत्रण सदस्य डॉ.राम गावडे, शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण, ज्ञानेश्‍वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, अविनाश बोरुंदिया, नंदकुमार वडगावकर, ज्ञानेश्‍वर बनसोडे, भागवत काटकर, अनिल कुऱ्हाडे, पांडुरंग गळवे, प्रतिक गुळवे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. 

          रक्तदान हे महादान आहे. गरजू व्यक्तींसाठी जीवनदान ठरणारे रक्तदान करणे ही मानवतेच्या हिताचे कार्य करण्याची मानवाला मिळालेली एक अमूल्य संधी आहे. सध्या रक्तदान हे काळाची गरज बनले आहे. कारण बदलत्या जीवनशैलीमुळे समाजात विविध आजारांचे वाढणारे प्रमाण, वारंवार होणारे अपघात, शस्त्रक्रियांचे वाढते प्रमाण, यामुळे रक्ताला मागणी खूप आहे. थेलेसिमिया आणि हिमोफिलिया या रक्ताच्या आजाराच्या रुग्णांना रक्ताची गरज असते असे ज्ञानगंगा इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष प्रा.विजय गुळवे यांनी सांगितले.