अनिलकुमार एन.ठवरे
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
दखल न्युज भारत
देलनवाडी :- आजही ग्रामीण भागात होनहार व हुशार विद्यार्थ्यांची कमतरता नाही परंतु आजची ग्रामीण भागाची परिस्थिती व शिक्षणाचे धोरण लक्षात घेता जो शैक्षणिक वातावरण विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे तो मिळत नाही. आणि म्हणूनच ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडतो आहे.त्यांना त्यांची क्षमता दाखवायला व्यासपीठच ऊपलब्ध नसते.आणि परिस्थितीमुळे पैसे खर्च करून स्पर्धा परीक्षेचे वर्ग लावणे हे सुध्दा परवडण्यासारखे नसते.
हेच हेरून मौजा देलनवाडी येथील स्थायी व इतरत्र वास्तव्यात असलेले सर्व आजी माजी कर्मचारी यांनी आपल्या गावाला आपल काही देणं लागत याचं भान ठेऊन सर्वजण एकत्र येत व आपल्या गावातील विद्यार्थ्यांना पोषक शैक्षणिक वातावरण मिळावं या उद्देश्याने आपआपल्या कुवतीनुसार काही योगदान देऊन अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेतला.

या अभ्यासिकामध्ये पोलीस भरतीपासून एम.पी.एस.सी पर्यंत स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे.
दिनांक १९/०१/२०२५ ला या अभ्यासिकाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. या प्रसंगी लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटक म्हणून गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान, अध्यक्ष महेंद्रजी ब्राम्हणवाडे काँग्रेस जिल्हा अध्यक्ष गडचिरोली,पो. नि.लांबतुरे आरमोरी,विशेष अतिथी विजयकुमार ठवरे सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी आरमोरी, प्रा. प्रदीप बोडणे,मिलिंद खोब्रागडे काँग्रेस तालुका अध्यक्ष, विनोदजी बावनकर माजी उपसभापती आरमोरी,सौ. प्रियंका कुमरे सरपंचा ग्रा. पं. देलनवाडी,सौ. संगिता पेंदाम सरपंचा वैरागड,त्रिलोकजी गावतुरे उपसरपंच,दिगेश्वर धाईत अधक्ष तं.मु.स. देलनवाडी, रत्नाकरजी धाईत संचालक कृ.उ.बाजार समिती आरमोरी,सौ. कोमलताई धूर्वे निमत्रिका, मिनेश्वर जांभुळे,राधेश्याम दडमल इत्यादी मान्यवर उपस्थतीत होते.
या कार्यक्रमाचे संचालन अनिलकुमार ठवरे,प्रास्ताविक गणेश आखाडे,आभार प्रदर्शन माणिक पेंदाम यांनी केले. या लोकार्पण सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी मनोज धाईत,कबीर कुंभलवार,विजय नेवारे,निकेश पदा यांचे विशेष सहकार्य लाभले.



