Home सांस्कृतिक चिमुकल्यांच्या उत्साहात रंगला तान्हा पोळा… — १३० च्या वर नंदीबैलांनी घेतला...

चिमुकल्यांच्या उत्साहात रंगला तान्हा पोळा… — १३० च्या वर नंदीबैलांनी घेतला होता सहभाग…

ऋग्वेद येवले

   उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली : विदर्भात खास बालगोपालांसाठी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा केला जातो. या दिवशी सर्व लहान मुले व मुली लाकडाच्या बैलाला सजवून त्याची मिरवणूक काढतात. हा बैल सजवण्यासाठी कितीतरी दिवस आधीपासूनच त्यांची लगबग सुरू झालेली असते. बैलाला रंगवणे, तोरण, फुलांनी सजवणे, त्याला आकर्षक बनवणे अशी लगबग बालगोपालांची असते.

            या आधुनिक युगात व ऑनलाईनच्या काळात आपली रूढी प्रथांची चिमुकल्यांना माहिती राहावी त्याकरीता असे आयोजन करणे गरजेचे असल्याचे मत जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केले. यामुळे पोळा सणाची माहिती लहान चिमुकल्यांना मिळते व मुलांमध्ये उत्साह पाहायला मिळतो.

          याकरिता पंचशील वार्ड मध्ये तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालगोपालांनी विविध वेशभूषा परिधान करून नंदीबैल सजवून आपली उपस्थिती मोठ्या प्रमाणात दर्शविली होती. सजविलेले बालगोपाल आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते.

          या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ नागरिक अभिमनजी शहारे यांच्या उपस्थितीत पार पडले प्रमुख पाहुणे म्हणून व्यंकटेश येवले, शरद उरकुडे ,कृष्णा बडवाईक ,योगराज बनसोड, दिनेश राऊत होते .

           या कार्यक्रमात 130 च्या वर नंदीबैल सहभागी झाले होते. सर्व नंदीबैल घेऊन आलेल्या बालगोपालांना नोटबुक व पेन पारितोषिक देण्यात आले.

            यावेळी चंद्रशेखर येवले, अश्विन शहारे, भास्कर येवले, राजेश शहारे ,गणेश येवले, दीपक येवले, हेमंत कोटांगले ,रोहित शहरे, नरेंद्र गजापुरे, तेजस राऊत, रोहित कोडापे यांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रयत्न केले तसेच बालगोपालांसह असंख्य गावकरी उपस्थित होते.