संपादकीय
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
सत्ता पक्षातंर्गत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री म्हणजे गृहमंत्री व अर्थमंत्री आणि इतर सर्व मंत्री,आमदार,”मुख्यमंत्री लाडकी बहिण,योजनेचा खूपच गाजावाजा करतांना दिसून येत आहेत.
तद्वतच महाराष्ट्र राज्यातील बहुतांश स्त्रियांना,”मुख्यमंत्री लाडकी बहिण,योजनेचा लाभ मिळावा म्हणून सदर योजना अन्वये वरच्यावर अटी व शर्ती मध्ये,”महाराष्ट्र शासनाने,बदल केलाय आणि अर्ज पात्रतेसाठी मार्ग सोपा केलाय.
“मुख्यमंत्री लाडकी बहिण,योजनेचा मार्ग सोपा करताना २ लाख ५० हजार रुपयांची अट ठेवणे होय.याचबरोबर उत्पनाचा दाखला वेळेवर मिळत नसेल तर त्या बदल्यात,”पिवळ्या किंवा केसरी रेशन कार्डची प्रत, अर्जासोबत जोडणे होय.
“मुख्यमंत्री लाडकी बहिण,योजणे अंतर्गत पात्र अर्जांसाठी उत्पनाची अट २ लाख ५० हजार रुपये ठेवणे म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी सत्ता पक्षाला मतदान करावे आणि परत सत्तेत बसविण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन बाळगावे,हा आशावाद सहाजिकच सत्ता पक्षांचा आहे,हे प्रामुख्याने स्पष्ट होतय.
जेवढ्या जास्त महिलांचे अर्ज,”मुख्यमंत्री लाडकी बहिण,योजणे अंतर्गत पात्र ठरतील,तेवढा जास्त प्रचार विधानसभा निवडणुकीमध्ये करण्याचा भर सत्ताधाऱ्यांचा असणारच!
प्रश्न हा पडतो की,”मुख्यमंत्री लाडकी बहिण,योजनांतर्गत लाभार्थ्यांच्या पात्रतेसाठी २ लाख ५० हजारांची उत्पन्न अट असेल तर,”महाराष्ट्र शासनाकडून,”संजय गांधी निराधार योजनांतर्गत व श्रावण बाळ योजनांतर्गत लाभार्थ्यांच्या अर्ज पात्रतेसाठी सुध्दा उत्पन्न अट २ लाख ५० हजार रुपयांची करणे आवश्यक आहे.
कारण,”संजय गांधी निराधार योजना,ही ६५ वर्षा खालील गरीब व गरजू नागरिकांसाठी कार्यान्वित आहे तर,”श्रावण बाळ योजना,६५ वर्षांच्या वरील आवश्यक गरीब व गरजू नागरिकांसाठी कार्यान्वित आहे.या दोन्ही योजनेत महिला व पुरुषांचा समावेश करण्यात आलेला आहे.
आणि “श्रावण बाळ व संजय गांधी निराधार,या दोन्ही योजनांतर्गत देशातील,”महिला व पुरुष,असलेल्या नागरिकांचा व मतदारांचा समावेश आहे हे महाराष्ट्र शासनाने लक्षात घेतले पाहिजे.
“महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागांतर्गत,संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ बाळ योजनांतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना दरमहा १ हजार ५०० रुपयांचा निधी दिला जातो आहे.
अनेक वर्षांपासून सुरु असलेली,”संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना, आणि नव्याने सुरू करण्यात आलेली,”मुख्यमंत्री लाडकी बहिण योजणा,महाराष्ट्र सरकार अंतर्गत येत आहेत.
मग,”महाराष्ट्र सरकार द्वारा,”मुख्यमंत्री लाडकी बहिण, योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी २ लाख ५० हजार रुपयांच्या उत्पनाची अट ठेवली असल्यामुळे,”श्रावण बाळ योजनांतर्गत व संजय गांधी निराधार योजनांतर्गत लाभार्थ्यांच्या पात्रतेसाठी सुध्दा २ लाख ५० हजारांची,”समान अट, महाराष्ट्र सरकार का म्हणून करीत नाही?हा प्रश्न उपस्थित होतो आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनांतर्गत,”लाडक्या बहिणी, मतदार आहेत तर संजय गांधी निराधार योजनांतर्गत व श्रावण बाळ योजनांतर्गत लाभार्थी सुध्दा लाडके भाऊ व बहीणीं आहेत हे महाराष्ट्र सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे ना?…
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीत,राज्यातील मतदार कुणाला मतदान करणार हे विधानसभा निवडणुक निकाला नंतर कळेलच!
श्रावणबाळ योजनांतर्गत,संजय गांधी निराधार योजनांतर्गत आणि मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनांतर्गत,सर्व गरीब लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे.”मग?”मुख्यमंत्री लाडकी बहिण व श्रावण बाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी,”उत्पन्नाच्या अटी मध्ये जमीन आसमानची तफावत का?
श्रावणबाळ योजना व संजय गांधी निराधार योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी फक्त २१ हजार रुपयांच्या उत्पनाची असलेली अट शिथिल करण्यात यावी व “मुख्यमंत्री लाडकी बहिण,योजणे प्रमाणे २ लाख ५० हजार रुपयांची उत्पन्न अट ठेवण्यात यावी,असे महाराष्ट्र सरकारला का म्हणून वाटत नाही?
योजना अंतर्गत,”एकाला मायेच आणि दुसऱ्यांना मावशीच समजून,”दुजा भाव करणे,बरोबर आहे काय?यावर महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आहे…


