Home Maharashtra अवैध रेती तस्करीचे ट्रॅक्टर पलटून चालकाचा जागीच मृत्यू… — नेरी सिरपूर...

अवैध रेती तस्करीचे ट्रॅक्टर पलटून चालकाचा जागीच मृत्यू… — नेरी सिरपूर मार्गावरील घटना…

     रामदास ठूसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

चिमूर:-

       नेरी सिरपूर मार्गावर आज दि. 24 जुलैला सकाळी 9 वाजताच्या दरम्यान गोरवट रेतीघाटा वरून रेती नेण्यासाठी बिना नंबरच्या ट्रक्टरने हमाल घेऊन जात असताना चालकाचे ट्रक्टरवरून नियंत्रण सुटल्याने ट्रक्टर रस्त्यावरून पलटी झाला आहे.

           यात चालक सागर घनश्याम बावणे वय 23 वर्षे राहणार नेरी हा जागीच मृत्यू झाला तर सोबत असणारे पाच हमाल ट्रक्टरच्या ट्रॉली वरून उडी घेऊन आपला जीव वाचविला आहे.

          या घटनेची माहिती चिमूर पोलीसांना होताच घटनास्थळी चिमूर पोलीस स्टेशनचे ए पी आय चांदे शिपाई विशाल आणि चालक शेख यांनी सदर मृतक सागर बावणेचा पंचनामा करून पुढील तपासणी साठी मृत्यू दह चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

            दरम्यान शवविच्छेदन करून मृतकाला कुटूंबियांना सोपविण्यात आले आहे पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.